पत्रकार परिषदेत ना. जयस्वाल यांची माहिती
गडचिरोली (Gadchiroli Gharkul) : जिल्ह्यातील घरकुलधारकांना पाच ब्रास रेतीची रॉयल्टी घरपोच देण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज नियोजन भावनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी पंडा, माजी आ. कृष्णा गजबे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांनी सहाशे रुपयांची पावती फाडल्यानंतर त्यांना देखील रेती उपलब्ध करून देणार असल्याचेही ना. जयस्वाल म्हणाले. (Gadchiroli Gharkul) जिल्ह्यात शेतीमध्ये समृद्धी आणल्याशिवाय क्रांती होणार नसून आदिवासी शेतकर्यांना सोलर पंप, बोरवेल देण्याची महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड होते. सिंचनाची सुविधा होण्यासाठी जास्तीत जास्त बोरवेल करण्याचा प्रयत्न असल्याचेही ना. जयस्वाल म्हणाले.
जिल्ह्यात दक्षिणेकडील भागात काजू पिकासाठी पोषक वातावरण आहे. काजू पिकासाठी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याबाबत कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. (Gadchiroli Gharkul) काजू पिकासाठी बाजारपेठ व भविष्यात काजू संशोधन प्रकल्प उभारण्याचा देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ना. जयस्वाल म्हणाले. येत्या जून महिन्यापर्यंत शेतकर्यांना धनाचा बोनस मिळेल असेही एका प्रश्नाचे उत्तरात ना. जयस्वाल म्हणाले. लोहमार्गासाठी सुरू असलेल्या अवैध उत्खननाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचेही ना. जयस्वाल म्हणाले.