Gadchiroli :- चामोर्शी शहरातील सी. डी. गांधी कृषी केंद्र (agriculture center) व साईराम अॅग्रो ट्रेडिंग या दोन कृषी केंद्रांविषयी शेतकर्यांकडून गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी प्रत्यक्ष कृषी केंद्राची पाहणी करून सबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देश् कृषी विभागाच्या (agriculture department) अधिकार्यांना दिले आहेत.
सबंधित कृषी केंद्राच्या तक्रारीची घेतली दखल
कृषी केंद्राची पाहणी केल्यानंतर शेतकर्यांच्या हक्कावर कुणीही डोळा ठेवू नये. शेतकर्यांसोबत कोणतीही बेईमानी खपवून घेतली जाणार नाही. शेतकर्यांच्या न्यायासाठी व योग्य दरात खते मिळावीत यासाठी नेहमीच ठामपणे उभा राहणार आहे. शेतकर्यांवर अन्याय करणार्यांवर कठोर कारवाई होणारच. शेतकर्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी मी सदैव लढा देत राहीन असे आ. डॉ. नरोटे यांनी सांगितले. कृषी विषयक काही तक्रार असल्यास जिल्हा तक्रार निवारण गुणवत्ता नियंत्रण कक्ष गडचिरोली ८२७५६९०१६९, तालुका तक्रार निवारण गुणवत्ता नियंत्रण कक्ष, चामोर्शी ९४२३४२२१५१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परीषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रेमदास गजभिये, चामोर्शी तालुका कृषी अधिकारी अमित तुमडाम, भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल पोहनकर, भाजपा तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, राकेश सरकार, रेवनाथ कुसराम, शेषराव कोहळे, भाविक आभारे नीरज रामानुजनवार, नरेश अलसावार व सहकारी उपस्थित होते.