गडचिरोली (Gadchiroli) :- जिल्ह्यातील मानव – हत्ती संघर्ष थांबविण्यासाठी जिल्ह्यात छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर ‘गजराज’ यात्रा काढावी अशी मागणी सहकार महर्षी अरविंद सा. पोरेड्डीवार यांनी केली आहे.
सहकार महर्षी अरविंद सा. पोरेड्डीवार यांची मागणी
पोरेड्डीवार यांनी पत्रकात म्हटले आहे की ,मानव व वन्यप्राणी संघर्ष आता तिव्र होत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.वाघांशी मानवाचा संघर्ष सुरु असतानांच आता हत्तीचा नवा संघर्ष मानवाशी होत आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्य शेतकरी (Farmer) व मानव यांच्याशी संघर्ष सुरु आहे.रानटी हत्ती जिल्ह्यात आले, वारंवार हत्ती का येत आहेत? याबाबत गोंड राजाच्या काळात आपल्या जिल्ह्यातुन हत्तींचा पुरवठा होत असावा असे वर्तविण्यांत आले. हत्तींना स्मरणशक्ती जास्त आहे .त्यामुळे ते पुर्वीच्या अधिवासामुळे येत आहेत अशी शक्यता आहे. याबाबत ‘महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र’ (Maharashtra Institution for Transformation Mitra) या शासकीय संघटनेद्वारा दि. ८ मे रोजी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यांत आली होती. या बैठकित वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हत्तींच्या वावराच्या संदर्भात चर्चा झाली व त्यावर उपाययोजना करण्यांबाबत शासनास कळविण्यांत यावे, असे ठरले.
हत्ती संघर्ष कमी करण्यांबाबत जनजागृती व्हावा, शेतकर्यांच्या शेतीच्या कामास सुरुवात झाली
शेजारच्या छत्तीसगढ राज्याने मानव व हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करण्यांबाबत आणि वन्यजिव संरक्षणाबाबत जनजागृती करणार्या गजरथ यात्रेला सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत शाळा, ग्रामपंचायत, बाजारपेठ व तेथील नागरीकांना हत्तींना हाताळण्यांसंदर्भात माहिती व सुरक्षा उपाय आणि सहजिवन या संदर्भात जनजागृती करण्यांत येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा गजराज यात्रा काढून मानव व हत्ती संघर्ष कमी करण्यांबाबत जनजागृती व्हावा, शेतकर्यांच्या शेतीच्या कामास सुरुवात झाली आहे. पर्हे, रोवणी, मशागत या कामासाठी शेतकर्यांना शेतीवर रहावे लागते. त्यामुळे याबाबत वेळीच उपाययोजना व्हावी अशीही मागणी पोरेड्डीवार यांनी केली आहे.