बुलढाणा (Ganeshotsav) : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी आज गणरायाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण परिसरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले की, “आज आमच्या घरी बाप्पाचे मंगल आगमन झाले आहे. (Ganeshotsav) गणरायाच्या आगमनाने वातावरणात आनंद, भक्ती आणि उत्साह भरून राहिला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात सुख, शांती, समृद्धी आणि ऐक्य लाभो, हीच आमच्या लाडक्या गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे.” यावेळी त्यांच्या अर्धांगिनी सौ. मृणालिनी सपकाळ, सुपुत्र यशवर्धन सपकाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.