गंगाखेड (Gangakhed Crime) : “तू आमच्या भावाला खायला घालीत नाही, त्यांचा व्यवस्थित सांभाळ करीत नाहीस”, असे म्हणून भावजयीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून, चापट बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोन दिरांविरुद्ध (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिरांविरुद्ध गुन्हा दाखल
माहितीनुसार, (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या वझुर तालुका पुर्णा येथील पार्वती पंडितराव लांडे या सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घरी असताना, गावातच राहणारे त्यांचे दिर साहेबराव दत्तराव लांडे व बालासाहेब दत्तराव लांडे हे दोघे दारू पिऊन घरी आले. त्यांनी भावजयी पार्वती पंडितराव लांडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ (Gangakhed Crime) करून, घराबाहेर जाय तू आमच्या भावाला खायला घालीत नाही. त्यांचा व्यवस्थित सांभाळ करीत नाहीस, असे म्हणून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. घरातील भांडे बाहेर फेकून देत, जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पार्वती पंडितराव लांडे यांनी दिली. दोन्ही दिरांविरुद्ध (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगाखेड पोलीस ठाण्याचे (Gangakhed Police) जमादार गणेश चनखोरे हे करीत आहेत.