गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
परभणी (Gangakhed Crime) : परभणीतील गंगाखेड येथे मोटार सायकल व ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध बुधवार 30 जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारीरिक व मानसिक छळ करून थापड बुक्क्यानी मारहाण!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथील नेहा नामक युवतीचा विवाह 11 एप्रिल 2020 रोजी लोहा मांडवा ता. हादगाव जि. नांदेड येथील आकाश गजानन चव्हाण याच्या सोबत झाला होता. लग्नानंतर, 6 महिने चांगले नांदविल्यानंतर सर्व कुटुंबं कामासाठी थेरगाव पिंपरी चिंचवड येथे राहण्यास गेले असता, पती व सासरच्या लोकांनी (In-Laws) घरगुती कारणावरून त्रास देत तु दिसायला चांगली नाहीस, तुला कामधंदा येत नाही, असे टोचून बोलत मोटार सायकल व ऑटो रिक्षा घेण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून 5 लाख रुपये आण म्हणत पती आकाश गजानन चव्हाण, सासू रेणुका गजानन चव्हाण, सासरा गजानन केशव चव्हाण, दिर नरेश गजानन चव्हाण सर्व रा. लोहा मांडवा ता. हादगाव जि. नांदेड हमु. पंचशील कॉलनी क्र. 2 गणेश नगर, डांगे चौक, थेरगाव पिंपरी चिंचवड आदींनी उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ (Torture) करून थापड बुक्क्यानी मारहाण व शिवीगाळ करीत पैसे आणले नाहीतर, तुला व तुझ्या आई वडिलांना मारून टाकू अशी धमकी दिल्याची फिर्याद नेहा आकाश चव्हाण रा. लोहा मांडवा ता. हादगाव जि. नांदेड हमु. शिवाजीनगर तांडा या विवाहितेने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून ठाणे अंमलदार पोउपनि फेरोज शेख, पो. शि. जगन्नाथ शिंदे यांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) केला. याचा पुढील तपास जमादार सुंदरराव शहाणे, पो.ना. संतोष मोहाळे करीत आहेत.