परभणीतील गंगाखेड तालुक्यातील तरुणाला गंडविले आरोपींवर गुन्हा दाखल..!
परभणी (Gangakhed Fraud Case) : गंगाखेड येथे लग्न लावून देतो, असे म्हणत मुलगी दाखवून दागिने व इतर वस्तुंची खरेदी केली. तरुणाला विश्वासात घेत ३ लाख ६६ हजार ९६० रुपयाला गंडविण्यात आला. (Gangakhed Fraud Case) फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपींवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचे प्रकरण विठ्ठल नगर ता.जि. जळगाव येथे घडले असल्याने तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील धारखेडा येथे राहणार्या एका ३१ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. सदर तरुणाच्या समाजात मुली मिळत नसल्याचा फायदा घेवून आरोपींनी तरुणाला मुलगी दाखवून तिच्या सोबत लग्न लावून देतो, अशी बतावणी केली. लग्न लावण्यासाठी तीन लाख रुपयांचे दागिने घेतले तसेच कपडे व इतर साहित्य खरेदी केले. (Gangakhed Fraud Case) युवकाकडून एकूण ३ लाख ६६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल विश्वासाने घेतला. त्यानंतर लग्न लावण्यासाठी टाळाटाळ सुरू केली.
हा प्रकार २४ जून ते २ जुलै या दरम्यान विठ्ठल नगर ता.जि. जळगाव येथे घडला. युवकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने ३ जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. भगवान सखाराम बचाटे, शेषेराव चिंतलवाड, शिवाजी वागटकर, मनिषा भैय्या पाटील, मिनाक्षी दिनेश जैन, मिना प्रकाश बोरसे, सुजाता ठाकूर, अक्षा गंगाधर जोशी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासकामी प्रकरण जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.