गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथे विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
परभणी (Gangakhed Murder Case) : गंगाखेड पोलिस ठाणे हद्दीतील मरगळवाडी येथून एक महिला बेपत्ता झाली होती. सदर महिलेच्या शोधासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळी असलेल्या चप्पलीवरुन श्वान टायसनने महिलेचा शोध घेतला. मरगळवाडी शिवारातील एका विहिरीजवळ जाऊन श्वान टायसन थांबला. विहिरीची पाहणी केली असता सदर विहिरीत बेपत्ता (Gangakhed Murder Case) महिलेचा मृतदेह आढळून आला.
गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी नियंत्रण कक्षाकडून श्वान पथकाला माहिती मिळाली. गंगाखेड पोलिस ठाणे हद्दीत मरगळवाडी येथे एक महिला राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी महिलेचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. महिलेचा तपास लावण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. प्रभारी अधिकारी तोटेवाड यांच्या आदेशाने श्वान हस्तक जाधव, बुधवारे, सादेक पठाण, श्वान टायसन, शकील हे मरगळवाडी येथे पोहचले. त्यांनी (Gangakhed Murder Case) घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना शेतात एक लालसर रंगाची चप्पल दिसून आली.
श्वान टायसनला या चप्पलीचा वास देण्यात आला. त्यानंतर टायसनने मार्ग काढत विहिरीजवळ गेला. या ठिकाणी उभे राहुन श्वान भूंकत होता. वरिष्ठांना माहिती देऊन विहिरीची पाहणी केली असता सदर विहिरीमध्ये (Gangakhed Murder Case) महिलेचा मृतदेह आढळून आला.
विहिरीत मिळाला मृतदेह ; नातेवाईकांनी केला संशय व्यक्त
गंगाखेड : येथील पोलिस ठाणे हद्दीत मरगळवाडी शिवारात २८ वर्षीय महिलेचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी मिळून आला. याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या खबरीवरुन गंगाखेड पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेच्या मृत्यू बाबत नातेवाईकांनी सासरच्या मंडळीवर संशय व्यक्त केला आहे. शुक्रवार दुपारपर्यंतही मयतावर शवविच्छेदन झाले नव्हते. मनिषा अशोक मरगळ (वय २८ वर्ष) असे मयत महिलेचे नाव आहे. या (Gangakhed Murder Case) महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला. तपास पोउपनि. सोनेराव बोडखे करत आहेत. मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतरही सासरकडील कोणीही न आल्याने माहेरच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. रुग्णालय परिसरात मयताच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली.