परभणी/गंगाखेड (Girl Birth Celebration) : मुलगी जन्माला आली की समाजातील काही कुटुंबात एक प्रकारची नाराजी व्यक्त केली जाते. काही कुटुंबात तर मुलगी नको म्हणून गर्भपात देखील केला जातो. मात्र गंगाखेड येथील सारडा परिवाराने (Girl Birth Celebration) मुलीच्या जन्माचा अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करून मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे वेगवेगळे संदेश देत समाजापुढं आदर्श ठेवला आहे.
शहरातील व्यंकटेश नगरात राहणाऱ्या सारडा परिवारात पाच मुली व सर्वात लहान असलेल्या आनंद भगवानदास सारडा यांच्या पत्नीने 6 एप्रिल रोजी परभणी येथील स्त्री रुग्णालयात चिमुकलीला जन्म दिला. श्री राम नवमीच्या दिवशी (Girl Birth Celebration) कन्या रत्न प्राप्त झाल्याने सारडा परिवाराने मुलीच्या जन्माचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केले. गुरुवार 10 एप्रिल रोजी स्त्री रुग्णालयातून सुट्टी झाल्याने आईसह मुलीला घरी आणण्यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे परिवार की दुलारी आई है हमारी राजकुमारी, बेटी नही है किसी से कम मिटा दो सारे भ्रम, जीवन का है आधार बेटी को ना समझो भार, पूज्य है जब हमारी कन्या क्यूँ करते है हम इनकी हत्या, बेटी तो है जग की जननी हमे रक्षा है अब उसकी करनी, बेटी बचाओ बेटी पढाओ असे एक ना अनेक वेगवेगळे संदेश देणारे स्टिकर लावून फुलांनी सजवलेली चार चाकी परभणी येथील स्त्री रुग्णाल्यासमोर उभी केली.
तेंव्हा मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा (Girl Birth Celebration) करणाऱ्या सारडा परिवाराच्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले. आईसह मुलगी रुग्णालयातून घरी आल्यानंतर घरासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे वाटप करून मुलीच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नवजात मुलीला घरी आणताना सारडा परिवाराने मुलीचे केलेले स्वागत पाहून परभणी येथील स्त्री रुग्णालय परिसरातील व गंगाखेड येथील नागरिक देखील आश्चर्यचकित झाले होते.
कन्या रत्न प्राप्त झाल्याचा मोठा आनंद
आई वडिलांना मी एक आणि मला पाच बहिणी आहेत. आमच्या परिवारात मला ही पहिली मुलगी झाल्यामुळं घरात आनंदाचे वातावरण आहे. समाजातील प्रत्येकाने मुलींच्या जन्मानंतर आनंदोत्सव साजरा करून (Girl Birth Celebration) मुलीचा स्वीकार करत मुलीच्या जन्माचे स्वागत करावे असे मुलीचे वडील आनंद भगवानदास सारडा यांनी सांगितले.