पिडित मुलीच्या पालकांचे पोलीस प्रशासनाकडे खेटे
नवा मोंढा, एएचटियु पथकाचे अपयश
परभणी (Girl kidnapping Case) : मेहंदी क्लासला जाते म्हणून घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना २४ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. या (Girl kidnapping Case) प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल आठ महिन्यानंतरही अपह्रत मुलीचा शोध लागलेला नाही. मुलीच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाकडे खेटे मारत आहेत. मुलीचा शोध लावण्यात नवा मोंढा पोलीस, एएचटियु युनिट यांना अपयश आले आहे.
शहरातील अहिल्याबाई होळकर नगरात राहणारी १७ वर्षीय मुलगी रामकृष्ण नगर येथे मेहंदी क्लासला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. मुलगी परत न आल्याने नातेवाईक, मित्रमंडळीकडे शोध घेण्यात आला. मात्र मुलगी मिळून आली नाही. त्यानंतर अज्ञाताविरोधात नवा मोंढा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला मुलीचा शोध घेतला. (Girl kidnapping Case) अपहरणकर्त्याविषयी माहिती काढली.
मात्र प्रत्यक्षात मुलगी मिळून आली नाही. मुलीचा शोध लावावा यासाठी अपह्रत मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देखील दिले. तसेच संशयीताविषयी माहिती देखील दिली. मात्र पोलिसांना सदर मुलीचा शोध लावता आलेला नाही.
त्यामुळे मुलीचे पालक हतबल झाले आहेत.
कागदोपत्री केला तपास
अपह्रत मुलीच्या (Girl kidnapping Case) पालकांनी पोलिसांना संशयीतां विषयी माहिती दिली. मात्र पोलिसांकडून प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली नाही. नवा मोंढा पोलीस, एएचटियु युनिटने कागदोपत्री तपास केला. परभणी जिल्ह्यातून मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. याचा शोध देखील लागलेला नाही. पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे टाकत आहेत.