आरोपी विरोधात परभणीच्या पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
परभणी (Girls Harassment) : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या सोबत सलगी करुन त्यानंतर अत्याचार करण्यात आला. ही घटना परभणीतील गंगाखेड तालुक्यातील एका गावात घडली. आरोपीच्या (Accused) त्रासाला कंटाळलेल्या पिडितेने सदर प्रकरणी 17 जुलैला पिंपळदरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बळजबरीने संबंध ठेवत अत्याचार करुन मानसिक त्रास!
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, पिडिता ही इयत्ता आठवी मध्ये असताना, तेंव्हा पासून ते पिडिता 10 वी मध्ये गेल्यापर्यंत, आरोपीने तिच्याशी सलगी करत शाळेत येता-जाता तिचा पाठलाग केला. आरोपीने बळजबरीने संबंध ठेवत अत्याचार (Torture) करुन मानसिक त्रास दिला. संबंध न ठेवल्यास पिडितेच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीकडून होणार्या या त्रासाला कंटाळून अखेर पिडितेने पिंपळदरी पोलीस ठाणे (Pimpaldari Police Station) गाठत तक्रार दिली आहे. आरोपी अक्षय सलगर याच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. तपास पोउपनि. अंधोरीकर करत आहेत.