Korchi alcohol news :- कारमधून दारूची तस्करी (Liquor smuggling) केली जात असल्याची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी सापळा रचून कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये याची लाखो रूपयांची दारू जप्त केली आहे.
२० पेट्या गोवा व्हिस्की दारू, १० पेट्या रॉयल्स स्टॅग, १० पेट्या किंगफिशर बीअरच्या बॉटला आढळून आल्या
कारमधून दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी जांभळी मार्गावर सापळा रचला. संशयीत टोयाटो कंपनीची कार येताच तिला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये २० पेट्या गोवा व्हिस्की दारू, १० पेट्या रॉयल्स स्टॅग, १० पेट्या किंगफिशर बीअरच्या बॉटला आढळून आल्या . पोलिसांनी या दारूसह कारही जप्त केली. याप्रकरणी धम्मम बोरकर गिधाडी ता. जि गोंदिया, लखन भैसा रा. बेळगाव ता. कोरची या दोघांना अटक करण्यात आली आहे. निर्मल अंकालू धमगाये, तरुण निर्मल धमगाये रा. कोरची हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे अधिक तपास करीत आहेत.
