दोन दिवस बॅडमिंटन स्पर्धा खेळविली जाणार
हिंगोली (Hingoli Dussehra Mahotsav) : सार्वजनिक दसरा महोत्सव समितीतर्फे उद्या 27 सप्टेंबर रोजी भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन हिंगोली जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता येथे सकाळी 9.30 वाजता करण्यात आले आहे. तर (Badminton Tournament) बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धा दोन दिवस खेळविल्या जाणार आहेत.
हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव (Hingoli Dussehra Mahotsav) समितीच्या वतीने बॅडमिंटन स्पर्धचे आयोजन 27 व 28 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, विधान परिषद आमदार हेमंत पाटील,खा. नागेश पाटील आष्टीकर, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सदस्य तथा आमदार तानाजी मुटकुळे,आ. संतोषराव बांगर, वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे, विधानपरिषद आमदार प्रज्ञाताई सातव, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सदस्य महंत कौशल्यादास महाराज, आदर्शचे प्राचार्य विलास आघाव, सदस्य तथा न.प मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंढे, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सदस्य तथा जिल्हा वकील संघाचे जिल्हाध्यक्ष एड.सुनील भुक्तार , सदस्य तथा गटविकास अधिकारी विष्णू भोजे, स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
ही बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजक हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव समिती (Hingoli Dussehra Mahotsav) व हिंगोली जिल्हा अमॅच्युअर बॅडमिंटन असोसिएशनचे कार्तिक यादव,सचिन चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यातील (Badminton Tournament) बॅडमिंटन स्पर्धकांनी या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.