पत्रपरिषदेत आ. किशोर जोरगेवार यांची माहिती
नागरिकांनी सहभागी होण्याचे केले आवाहन
चंद्रपूर (Chandrapur Tiranga Yatra) : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी नॅशनल सेक्युटीसाठी नागरिक या उपक्रमा अंतर्गत चंद्रपुरात उद्या १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी चौकापासून भव्य (Chandrapur Tiranga Yatra) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
तिरंगा रॅली Chandrapur Tiranga Yatra) ही कुण्या एका राजकीय पक्षाकडून काढण्यात येत नसून ती नॅशनल सेक्युटीसाठी नागरिक या संस्थेच्या माध्यमातून काढण्यात येत असल्याने सर्व पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी आ.जोरगेवार यांनी केले. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होईल. यानंतर ही रॅली गांधी चौक, जटपूरा गेट मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात परत येईल आणि तेथे रॅलीचा समारोप करण्यात येईल. या देशभक्तीपूर्ण (Chandrapur Tiranga Yatra) रॅलीत सहभागी होऊन आपल्या लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी उपक्रमात भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सदर पत्रकार परिषदेला ओबीसी नेते अशोक जिवतोडे, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, माजी महापौर अंजली घोटेकर, प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सुभाष कासनगोट्टूवार, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदींची उपस्थिती होती.