सुधाकर नगर तांडा (पेढी) येथील घटना
महागाव (Grandmother Murder Case) : तालुक्यातील सुधाकर नगर तांडा ( पेढी ) येथे मनोरुग्ण असलेल्या नातू ने आजीवर गंभीर वार करून आजीचे जीवन संपविले. ही (Grandmother Murder Case) घटना काल सकाळी १०:३० च्या दरम्यान घडली असून श्याम उत्तम जाधव असे मनोरुग्ण आरोपीचे नाव आहे.
महागांव तालुक्यातील सुधाकर नगर तांडा ( पेढी ) येथील मनोरुग्ण असलेल्या नातू श्याम उत्तम जाधव वय ( २६ ) ने आपल्या आजीला १० रू मागितले. कोंडीबाई बालचंद जाधव वय (८५) आजीने १० रुपये देण्यास नकार दिल्यामुळे आजीवर लाकडी दांड्याने छातीवर वार करत तिला जागीच ठार केले. संबंधितांनी हा (Grandmother Murder Case) प्रकार महागाव पोलीस स्टेशनला कळविला. नंतर महागाव पोलीस स्टेशन ने मनोरुग्ण आरोपीला ताब्यात घेतले. वृत्तलेपर्यंत पुढील तपास सुरू होता.