कन्हान (Jagatguru Tukaram Maharaj) : संत तुकाराम मंदीर, संत तुकाराम नगर कन्हान येथे पुजा, अर्चना, भजन, दहीकाला करून जगतगुरू संत तुकाराम महाराजांना बिज निमित्य अभिवादन करण्यात आले.
जगतगुरू संत तुकाराम महाराजांनी (Jagatguru Tukaram Maharaj) त्याकाळी सर्व सामान्य लोकांना आपल्या भजनातुन, किर्तनातुन समाज प्रबोधन करून खरी लोक सेवा केली. त्यांचा मुत्यु दिवस हा बिज म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करित त्यांच्या स्मृती निमित्य भजन, पुजन करून संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्यात येते. याच नुसार दरवर्षी प्रमाणे रविवार (दि.१६) मार्च ला संत तुकाराम नगरवासीया व्दारे संत तुकाराम मंदीरात जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली.
मान्यवरांनी पुजा, अर्च ना व (Jagatguru Tukaram Maharaj) तुकाराम महाराजांना अभिवादन करून श्री संत गजानन भजन मंडळ कन्हान चे भगवान लांजेवार, चिरकुट पूंडेकर, गजानन वडे, रमेश गणोरकर, हरिना थ लेंडे, श्रावण लांजेवार, देवराव गोतमारे, नथ्थुजी चरडे, गुलाब ढोबळे, हीरालाल लुहुरे, पुरूषोत्तम कुंभ लकर, मोतीलाल सुर्यवंशी, संगिताबाई कोमटी आदीनी भजन गायन करून दहीहंडी फोडुन दहीकाल्याचा प्रसाद वितरण करून (Jagatguru Tukaram Maharaj) संत तुकाराम बिज निमित्य सर्व उपस्थितांनी जगतगुरू तुकाराम महाराजांना तिवार अभिवादन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता ताराचंदजी निंबाळकर, विठ्ठल मानकर, स्वप्निल मते, शांताराम जळते, मनोहर लुहुरे, गुंडेराव ठाकरे, एकनाथ खर्चे, अशोक ठाकरे, रामराव लुहुरे, हरिष ठाकरे, नामदेव नवघरे, सुधिर घोड के, शकुंतला डोणारकर, नंदा लुहुरे, सुनिता मानकर, रंजनी निंबाळकर, प्रमिला मते, पुष्पा घोडके, लक्ष्मी गडे, लता मेहर, प्रिती मानदाते, निशा फरसोले, मीना मनगटे, शशी सोनबावने आदीसह नगरवासीयांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.