ताडकळसच्या पिंगळी येथील कारवाई!
परभणी (Gutkha Seized) : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी येथे एका किराणा दुकानावर पोलीसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत 37 हजार 720 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात दोन (Tadkalas Police Station) आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकान मालकास ताब्यात घेतले आहे.
दोन आरोपींवर ताडकळस पोलीसात गुन्हा दाखल!
स्थानिक गुन्हा शाखेचे पथक (Local Crime Branch Team) रविवार 11 मे रोजी ताडकळस पोलिसांच्या हद्दीतील पिंगळी परिसरात गस्तीवर असताना गावातील एका दुकानातून अनाधिकृतपणे राज्य सरकारने (State Govt) प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री (Sale of Gutkha) होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने किराणा दुकानात धाड टाकली असता, या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या गुटख्याचचे पुडे आढळून आले. यासंदर्भात पोलीस पथकाने (Police Team) चौकशी करून माहिती घेतली यात एकूण 37 हजार 720 रुपयांचा गुटखा पथकाने जप्त केला. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.




