4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त!
परभणी (Gutkha Seized) : परभणीच्या गंगाखेड येथे कोद्री रस्त्यावर खादगाव पाटीजवळ रविवार 1 जून रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एका ओमीनी कारमध्ये (Omni Car) महाराष्ट्र शासनाने उत्पादन व विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला, गुटखा (Gutkha) आढळून आल्याने गंगाखेड पोलिसांनी (Gangakhed Police) एका विरुद्ध गुन्हा दाखल करून 1 लाख 3730 रुपयांचा गुटखा व तीन लाख रुपयांची कार असा एकुण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) केला आहे.
गुटखा सेवन केल्यास कँसर सारखा आजार होऊ शकतो, हे माहिती असतांनासुद्धा चोरट्या मार्गाने विक्री!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी गंगाखेड पोलीस ठाण्यातील जमादार मोती साळवे व पो. शि. शंकर दहिफळे हे रविवार 1 जून रोजी महाराणा प्रतापसिंह जयंती बंदोबस्त करून रात्री 9 वाजेच्या सुमारास तालुक्यातील माखणी येथून गंगाखेडकडे परत येतांना गंगाखेड ते कोद्री जाणाऱ्या रस्त्यावरील खादगाव पाटीजवळ एका मारोती ओमनी कारमध्ये (क्रमांक एमएच 12 एनजे 8044) महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) उत्पादन व विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला, गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने जमादार मोती साळवे व पो. शि. शंकर दहिफळे यांनी अंदाजे 9:30 वाजेच्या सुमारास कारची पाहणी करत त्यामध्ये गुटखा असल्याची खात्री झाल्यानंतर, प्रभारी अधिकारी सपोनि आदित्य लोणीकर यांना याची माहिती देत गस्तीवर (Patrol) असलेल्या पोउपनि राहुल लोखंडे, पो. शि. संदीप गित्ते, पो. शि. सतिश पांढरे यांना बोलावून चालक रतन वैजनाथ मोटे रा. अकोली याच्यासह ओमनी कार पोलीस ठाण्यात आणून झाडती घेतली असता, त्यामध्ये अंदाजे 103730 रुपयांचा गोवा पान मसाला जि. वन तंबाखू, विमल पान मसाला, आर.एम.डी. आदी प्रकारचा गुटखा मिळून आला. मानवाने गुटखा सेवन केल्यास त्यास कँसर सारखा आजार होऊन त्याचा मृत्यु होऊ शकतो. हे माहिती असतांनासुद्धा चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी एक लाख रुपये पेक्षा अधिक किंमतीचा गुटखा जवळ बाळगल्या प्रकरणी जमादार मोती संभाजी साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक रतन वैजनाथ मोटे वय 24 वर्ष याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके 2006 अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. 103730 रुपयांचा गुटखा व 3 लाख रुपये किंमतीची ओमनी कारसह एकुण 4 लाख 3730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याचा पुढील तपास पो.उप. नि. विशाल बुधोडकर हे करीत आहेत.
शहर व परिसरात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री!
गंगाखेड शहर व परिसरात लहान मोठ्या पान टपरीसह किराणा दुकानावर ठोक व किरकोळ दरात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री केल्या जात असुन हा गुटखा परराज्यातून आयात करून चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
परभणीतील गुटख्याची मुळे शोधावी!
महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन व विक्री करण्यासाठी प्रतिबंधित केलेला, गुटखा एव्हढ्या मोठ्या प्रमाणात गंगाखेड तालुका परिसरात कोठून आला. शहर व परिसरात या गुटख्याची वाहतूक (Transportation of Gutkha) व विक्री कोण कोण करीत आहे याची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलीसांनी प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे.