पंचनामा करत मृतदेह दैठणा पोलिसांनी घेतला ताब्यात!
परभणी (Hanged Corpse) : तालुक्यातील पोखर्णी शिवारात इंद्रायणी नदी पुलाजवळ एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत गुरुवार 26 जून रोजी सकाळच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. घटनेची माहिती दैठणा पोलिसांना (Police) देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीसाठी (Northern Inspection) जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. इसमाच्या मृत्यु मागचे कारण समजू शकले नाही.
पुलाजवळ लिंबाच्या झाडाला एका इसमाने घेतला गळफास!
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बालाजी लक्ष्मण खेत्रे वय 38 वर्ष रा. घोडा कौडगाव ता. परळी जि. बीड, असे मयताचे नाव आहे. पोखर्णी शिवारात इंद्रायणी पुलाजवळ लिंबाच्या झाडाला एका इसमाने गळफास घेतला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सपोनि. अशोक जायभाय पोउपनि. बळीराम मुंढे, पोलीस अंमलदार कातकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मयताची ओळख पटविली. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) आणण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
रेल्वे स्थानक परिसरात आढळला मृतदेह!
परभणी : परभणी येथील रेल्वे स्टेशन परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह 25 जून रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास आढळून आला. रेल्वे स्टेशन अधीक्षक गौरव शर्मा यांनी दिलेल्या खबरीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात (Nava Mondha Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. टरके करत आहेत.