अभियानामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, आकर्षक अश्या रांगोळ्या काढल्या!
हिंगोली (Har Ghar Tiranga) : हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2025, माझी वसुंधरा अभियान 6.0 राज्य शासनामार्फत हिंगोली नगर नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानची अंमलबजावणी संपूर्ण हिंगोली शहरामध्ये चालू आहे. तसेच शहरातील विविध ठिकणी देखील जनजागृती करण्यात येत आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत (Har Ghar Tiranga Campaign) हिंगोली नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद बालक मंदिर प्राथमिक शाळा (Nagar Parishad Balak Mandir Primary School) येथे हर घर तिरंगा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर अभियानामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी (Students) सहभाग नोंदविला व तिरंगा थीमची आकर्षक अश्या रांगोळ्या काढल्या. सदरील स्पर्धेमध्ये प्रथम स्वरांजली विष्णू बांगर, द्वितीय ज्ञानेश्वरी राजू घुगे, तृतीय पंकजा लखन घोडे व प्रोत्साहनपर श्रुती सतीश ठोंबरे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज हा नागरिकांनी (Citizens) आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे अशी माहिती विद्यार्थांना देण्यात आली. यावेळी मुख्यध्यापक दत्तराव जळ्बाजी घुगे, अश्विनी कदम, स्वाती शेळके, अखतरी बेगम, गोविंद चव्हाण, अथर्व वर्मा, आकाश गायकवाड, रवि जोंधळे आदि शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.