बार्शीटाकळी (Devi Mahotsav) : देवी महोत्सवात जनतेच्या हिताकरिता रोगनिदान शिबिराचे आयोजन, हा उपक्रम प्रशंसनीय आहे, असे मत बार्शीटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ (Praveen Dhumal) यांनी व्यक्त केले.
बार्शीटाकळीच्या संताजी नगर तेलीपुरा येथील रुग्णसेवक नितेश वाघमारे यांच्या पुढाकाराने जय जगदंबा मंडळ व न्यूट्रे जीनिकम यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव काळात (Devi Mahotsav) देवी मातेच्या निमित्ताने, विविध प्रकारच्या रोग निदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती 3 ऑक्टोबरला दिली. यावेळी विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर मंदार वाघमारे, आशीष समित तुळजापुरे, अनुपमा भेंडे तुळजापुरे, पूजा खेतान, प्रणव चेरखे, तुषार मोरे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विविध आजाराच्या रुग्णांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर विनामूल्यउपचार करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला बार्शीटाकळी चे ठाणेदार प्रवीण धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव केदारे, दीपक अंबाडे, संजय कुरोडे, ओमप्रकाश उखळकर, शेखर काटेकर, संतोष आपुणे, अनंत केदारे, बबन ढेंगळे, प्रकाश माणिकराव, मारुती भगत, अरविंद भुजाडे, अमोल केदारे ,गजानन गद्रे ,लक्षण वाघमारे, पवन वाघमारे, मंगेश वाघमारे, विष्णू आगाशे ,संजय कारावाडिया, रमेश वाटमारे, मदन धात्रक, बबलू चावके, रवी भगत ,विशाल भुजाडे, देवेंद्र आगाशे ,शुभम राजूरकर ,ज्ञानू वाघमारे, हर्षल केदारे, अभिनव भगत, गणेश खोपे ,राहुल गोर ,मंगेश कळम ,शैलेश ढोंगळे असे अनेक जण उपस्थित होते.
पुढे बोलताना ठाणेदार (Praveen Dhumal) म्हणाले की, जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, सद्यस्थितीच्या काळात अशा प्रकारचा चांगला व शिस्तबद्ध पद्धतीने केलेला उपक्रम प्रशंसनीय आहे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कोमल भगत तर आभार प्रदर्शन दिनेश वाघमारे यांनी केले. (Devi Mahotsav) सदर कार्यक्रमात लहान मुलापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.