गडचिरोली (Gadchiroli) :- येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी सेंटर तर्फे अति दुर्गम व आदिवासी बहुल भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात मोफत आरोग्य तपासणी उपचार व साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
१४ वर्षापासून १ मे रोजी राबवीला जातो उपक्रम
विशेष म्हणजे अत्यंत खडतर रस्ता, नक्षलग्रस्त प्रदेश असतानाही डॉ. अनंत कुंभारे यांच्या नेतृत्वात मागील १४ वर्षापासून १ मे रोजी हा उपक्रम अव्याहातपणे सुरू आहे. त्यांच्या सोबतीला गडचिरोली येथील डॉ.यशवंत दुर्गे, ड. रोहन कुमरे, पारिचारीका. राजू बत्तुलवार , शाम सरदार , हर्ष दौडेकर, हर्षल मडावी, कोमल उंदीरवाडे, प्रदिप हेडाऊ, परीमल हेडाऊ, आकाश चांदेकर, अजय पठान, सचीन येरमेड्डीवार, एन . लोडल्लीवार आदी तज्ञांच्या चमुने दरवर्षी प्रमाणे १ मे २०२५ दरवर्षी बिनागुंडा येथे आरोग्य शिबीर, औषधी वितरण, कपडे वाटप, मच्छरदानी वाटप, रक्त तपासणी(Blood test), मलेरिया तपासणी, व्हॉलिबॉल वाटप आदी उपक्रमांचे आयोजन केले होते.
शिबीरात २०० नागरीकांची आरोग्य तपासणी
या आरोग्य तपासणी (Health Check) शिबीरात २०० नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ७ मलेरिया पी.एफ. तपासणी केली. गर्भवती (pregnant) महिलांची तपासणी करण्यात आली. छातीचे एक्सरे काढण्यात आले. नेत्र तपासणी (Eye test) करून शिबीराच्या १० दिवसांनी चष्मे वितरण करण्यात येईल अशी माहिती रूग्णांना देण्यात आली. रस्ता नाही, लाईट नाही अशा विपरीत परीस्थितीत जिवन जगत असलेल्या बिनागुंडा तसेच आसपासचे गाव कूवाकोडी, पेरीपलभट्टी, फोदेवाडा, तूर्रेमरका आदी भागातील नागरीकांना आरोग्य सेवा पुरविणे हेच ध्येय असल्याचे शिबिराचे आयोजक डॉ. अनंता कुंभारे यांनी सांगितले. या उपक्रमाचे अतिदुर्गम भागातील नागरीकांनी स्वागत करून डॉ. कुंभारे , डॉ. दुर्गे व अन्य सहभागी चमुचे आभार मानले. तुर्रेमरका येथील एक विद्यार्थी जिद्द व चिकाटीने जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या विद्यार्थ्याचा आदर्श डोळयसमोर ठेऊन अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे असे आवाहन डॉ. कुंभारे यांनी केले.