बीएएसएस डॉ.अनिल सोनुने याचे विरुध्द गुन्हा दाखल
पुसद (Health Dept Crime) : शहरात अवैधपणे एक बोगस डॉक्टर गुपितपणे गर्भनिदान करीत असल्याची गोपनीय माहिती पुसद ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांना मिळाल्यावरून त्यांनी शहर पोलीस ठाण्यात त्या बोगस डॉक्टर विरुद्ध तक्रार दाखल केली.सदर प्रकरणी दोषी बोगस डॉक्टर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात बोगस डॉ. अनिल रामदास सोनुने (३९) रा. काहकर पो. केंद्र ता. सेनगाव जिल्हा हिंगोली यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर एक्ट. १९६१ कलम ३५ व कलम ३६ अन्वये गुन्हा दाखल होण्याबाबत फिर्याद दिली आहे. डॉ. एम. एम. भेलोंडे वैद्यकीय अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालय पुसद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये यवतमाळ येथील डॉ. रमेश मांडन, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती लामकासे, विकास पवार व चालक संजय रामटेके यांचे पथक आले.
कोसलगे कॉम्प्लेक्समध्ये डॉ. अनिल रामदास सोनुने हे डॉक्टर म्हणून व्यवसाय व प्रॅक्टिस करतात यांच्या बद्दल तक्रार प्राप्त झाली होती. या अनुषंगाने त्यांच्यावर धाड मारण्या एका बनावट गरोदर महिला व एक सहकारी महिला या कोसलगे कॉम्प्लेक्स खाली हजर होत्या. तेव्हा (Health Dept Crime) बोगस डॉक्टर अनिल सोनुने खाली आला व गरोदर असलेल्या महिलांना कोसलगे कॉम्प्लेक्स मध्ये नेले. आणि कॉम्प्लेक्स च्या पहिल्या मजल्यावर गेले असता दरवाजा बंद होता. तेव्हा पथकातील सदस्यांनी दरवाजाला धक्का देऊन उघडले आतल्या रूममध्ये अंधार होता.मशीन च्या बाजूला दोन गरोदर महिला बसलेल्या होत्या त्यामध्ये बनावट गरोदर महिला सुद्धा होती.
गरोदर महिलेच्या पोटावर प्रॉब धरून डॉक्टर अनिल रामदास सोनुने हा होता. तेव्हा डॉक्टर बघताच घाबरून गेला. त्यांना अधिक विचारपूस केली असता ते उडवा उडवी चे उत्तरे देत होते. त्यानंतर पथकाने सेंटर चेक केल्यानंतर मशीनवर अधिकृत नंबर नव्हता तसेच पीसीपीएनडीटी अंतर्गत प्रमाणपत्र सुद्धा नव्हते. तसेच विजयकुमार लोणकर सी. पी. एस. डी. जिओ हे त्या सेंटरवर मशीन हाताळण्याची परवानगी असताना ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते.
डॉक्टर अनिल सोनुने बीएएमएस यांना सोनोग्राफी मशीन हाताळण्याचे शिक्षण नसताना शैक्षणिक पात्रता नसताना सोनोग्राफी करताना रंगेहात पकडले.
हे बोगस डॉक्टर लोकांना डॉक्टर असल्याची माहिती देऊन फसवणूक करीत आहे. यावरून या (Health Dept Crime) बोगस डॉक्टर वर वरील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काळे करीत आहेत.