गर्भवती महिला मृत्यू प्रकरण

'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

Pregnant woman's death case: जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली

'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

Pregnant woman's death case

 

स्त्री रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; सात  सदस्यीय समितीकडून चौकशी....!

परभणी  (Pregnant woman's death case) : येथील जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. दैनिक देशोन्नती’ने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ही बातमी लावून धरली होती. या वृत्ताची तत्काळ दखल घेत आरोग्य विभागाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. अखेर या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत रुग्णवाहिका सुविधातील सुमित कंपनीच्या दोन डॉक्टर आणि दोन कर्मचार्‍यांना सोमवार १० रोजी सायंकाळी निलंबित करण्यात आल्याची माहिती सुमित कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली.

या (Pregnant woman's death case) घटनेच्या सखोल तपासासाठी आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक दयानंद मोतीपवळे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची विशेष चौकशी समिती परभणीत दाखल झाली आहे. या समितीने नुकतीच परभणीच्या जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयाला सोमवार १० रोजी सायंकाळी  भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत चौकशी सुरू केली. तसेच मंगळवारी जिल्हा रुग्णालयात संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत.

या (Pregnant woman's death case) घटनेस जबाबदार धरण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे डॉ. कुलदीप चोरमले डॉ. अभिजीत इप्पर या दोन डॉक्टरांसह १०८ रुग्णवाहिका चालक मोहम्मद जलाल तसेच केशव यादव या चार जणांचे सुमित कंपनीने निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. याबाबत रुग्णवाहिका चालक व डॉक्टर या सर्वांची तब्बल दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीत वैद्यकीय सेवा पुरवण्यात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले.

'दैनिक देशोन्नती' च्या बातमीचा दणका!
या संवेदनशील घटनेनंतर 'दैनिक देशोन्नती'ने सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला जाब विचारला होता. अखेर या बातमीची दखल घेत आरोग्य विभागाने दोषींवर तातडीने निलंबनाची कडक कारवाई केल्याने, पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे.

संबंधित सामग्री

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

Aug 13, 2026
परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

Parbhani Urea Black Marketing: युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.

Aug 07, 2026
परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

Gangakhed SIR Campaign: गंगाखेड तालुक्यात निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर कार्यक्रम) मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघ..

Aug 05, 2026
पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

PDC Bank: सहकारी बँकेतच्या उपाध्यक्षपदी गेल्या भव्यांवर नाविने अच्याः रामप्रसाद कदम आणि उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा पाटील राझेश यांची बिनविरोध निवड झाली.

Aug 03, 2026
परभणीत बाळाला जन्म दिल्यानंतर फुटले बालविवाहचे बिंग

परभणीत बाळाला जन्म दिल्यानंतर फुटले बालविवाहचे बिंग

Parbhani Child Marriage: पालम तालुक्यातील १६ वर्षीय मुलगीच्या बलात्कारबादल्यामुळे मागे पडलेल्या बाळाचे जन्म देण्याचा क्रमबद्ध विवाहविवरोधासाठी निदर्शक गुन्ह्याची नोंद घेतली.

Aug 03, 2026