झेंडा चौक गणेश उत्सव मंडळ

बिडगाव येथे मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ganesh Utsav: बिडगाव नगरपंचायतमधील वॉर्ड क्र. 14 येथील झेंडा चौक गणेश उत्सव मंडळ परिसरात शासनाच्या वतीने मोफत रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (शुगर) तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन

बिडगाव येथे मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ganesh Utsav Health Camp

बिडगाव (Ganesh Utsav) : बिडगाव नगरपंचायतमधील वॉर्ड क्र. 14 येथील झेंडा चौक गणेश उत्सव मंडळ परिसरात शासनाच्या वतीने मोफत रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (शुगर) तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपकेंद्र तारोडी व प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) भुगांव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन बिडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष वीरू जामगडे, नगरउपाध्यक्ष निकेश कातुरे, शिक्षण समितीचे सभापती प्रीतम बोकडे तसेच संतोष तिजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या (Ganesh Utsav Health Camp) शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय भुजाडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रिव्यानी मेश्राम, डॉ. सुशांत बोकडे, आरोग्य सेवक सुभाष भांडारकर, विनोद घरडे, तसेच आशा सेविका सीमा सतफळे व शीतल हिवसे यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. परिसरातील शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत बीपी व शुगरची मोफत तपासणी करून घेतली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार नागरिकांना आरोग्य विभागामार्फत मोफत औषधोपचार व औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाबाबत नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या (Ganesh Utsav Health Camp) आयोजनासाठी झेंडा चौक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. नारायण दहरवाल, अक्षय इंगळे, आयुष नरणावरे, शिवम कायते, अश्विनी इंगळे, तनु वानखेडे, उर्वी जीवानी व सलोनी सोनी यांनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य तपासणी व आवश्यक औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टैग्स: Ganesh Utsav