गोंदिया मोफत आरोग्य शिबिर

गोंदिया मालगोदामात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Gondia Free Health Camp: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेतील नागपूर मंडळांतर्गत गोंदिया मालगोदाम येथे बुधवार, २३ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वे मालगोदाम कामगार संघ मोफत आरोग्य तपासणी..

गोंदिया मालगोदामात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Gondia Free Health Camp

 

भारतीय रेल्वे मालगोदाम कामगार संघाचे आयोजन;
मोठ्या संख्येने कामगारांची आरोग्य तपासणी

गोंदिया (Gondia Free Health Camp) : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेतील नागपूर मंडळांतर्गत गोंदिया मालगोदाम येथे बुधवार, २३ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वे मालगोदाम कामगार संघाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला मोठ्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली.

या (Gondia Free Health Camp) शिबिरात शासकीय रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक्षा नदेश्वर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश देवद्रा तसेच आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉ. खान यांच्यासह वैद्यकीय पथक उपस्थित होते. डॉक्टरांनी कामगारांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांपासून बचाव, नियमित आरोग्य तपासणी तसेच आजारांची सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित न करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

संघाचे राष्ट्रीय प्रभारी मनोरंजन कुमार पासवान यांच्या आदेशानुसार आणि मध्य प्रदेश प्रभारी रणवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मालगोदामात कार्यरत कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून घेतली.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय अधिकारी शेखर आणि त्यांच्या पथकाच्या वतीने शिबिरासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय पथक आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून शिबिर सुरळीतपणे पार पडले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कामगारांनी राष्ट्रीय प्रभारी मनोरंजन कुमार पासवान तसेच मध्य प्रदेश प्रभारी रणवीर सिंह यांचे आभार मानले. कामगार दिवसभर कठीण परिस्थितीत काम करतात. अशा परिस्थितीत कार्यस्थळीच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होणे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते. भविष्यातही कामगारांच्या आरोग्य आणि कल्याणाशी संबंधित अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून कामगारांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिबिराच्या समारोपप्रसंगी उपस्थित कामगार आणि पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने ‘जय श्रमिक, जय संघ’ असा जयघोष केला.

टैग्स: Gondia Free Health Camp