खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्र

खानापूर चित्ता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचालींना आला वेग..

Khanapur Primary Health Centre: खानापूर चित्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीची व्हावी अशी मागणी पूर्ण होत असल्याचे दिसत आहे. परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्राथमिक आरोग्य

खानापूर चित्ता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचालींना आला वेग..

Khanapur Primary Health Centre

 

जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण; आरोग्य केंद्राच्या उभारणीचा मार्ग सुकर

खानापूर चित्ता (Khanapur Primary Health Centre) : हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मागील अनेक वर्षापासून खानापूर चित्ता येथील ग्रामपंचायत कार्यालयाची धडपड सुरू होती. की, खानापूर चित्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीची व्हावी अशी मागणी पूर्ण होत असल्याचे दिसत आहे. परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीच्या हालचालींना आता वेग आला आहे.

प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निश्चित करण्यात आलेल्या गट नं. १२९  जागेची भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यावेळी सिरसम आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास शिंदे, अभियंता पाटील, भूमी अभिलेखचे सुरवसे त्यासह गावातील पंच म्हणून ज्ञानेश्वर जाधव, मारोतराव जाधव तमुअ, दत्तराव पवार, संतोष पाईकराव, सुभाष पाईकराव यासह गावातील प्रल्हाद पवार, शिवाजी जाधव, रामचंद्र पवार, संतोष जाधव, कान्हा जाधव, रंगा पाईकराव आदीसह   उपस्थित होते. पंचा समक्ष पंचनामा करून मोजणीच सुरुवात करण्यात आली  त्यामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या आरोग्य केंद्राच्या उभारणीच्या प्रक्रियेला महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

खानापूर चित्ता तसेच परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवेसाठी अनेकदा दूरवर जावे लागते. त्यामुळे गावातच सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रासाठी जागेची प्रक्रिया पुढे नेण्यात आली असून आता भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याने पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जमिनीची मोजणी ही आरोग्य केंद्राच्या उभारणीपूर्वीची महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. मोजणी पूर्ण झाल्यामुळे प्रस्तावित जागेची हद्द निश्चित होण्यास मदत झाली आहे. आता संबंधित विभागांकडून आवश्यक त्या प्रशासकीय बाबी पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाच्या दिशेने पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे.

नागरिकांच्या आरोग्यसेवेला मिळणार आधार

खानापूर चित्ता (Khanapur Primary Health Centre) आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना ताप, सर्दी, किरकोळ आजार, प्राथमिक उपचार, माता-बाल आरोग्य सेवा तसेच विविध आरोग्यविषयक सेवांसाठी सध्या उपलब्ध सुविधांवर अवलंबून राहावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वेळेवर प्राथमिक उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याने या आरोग्य केंद्राच्या उभारणीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोजणी पूर्ण झाल्याने अपेक्षा वाढल्या

भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने आरोग्य केंद्राच्या कामाबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आरोग्य केंद्राची इमारत उभी राहून ते प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्यानंतर खानापूर चित्ता परिसरातील आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यांनाही गती मिळणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.