उष्णतेच्या लाटेचा इशारा

लातूर जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक, आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन

Heat wave warning: लातूर जिल्ह्यात तापमान 40 अंशावर गेल्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेला आहे. आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचावासाठी उपाययोजना

लातूर जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक, आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन

Heat wave warning

आरोग्य विभागाने केले सतर्कतेचे आवाहन

लातूर (Heat wave warning) : लातूर शहर व जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून बुधवारी लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशावर गेला. तापमान वाढल्याने दुपारच्या वेळी रस्ते सुनसान होत आहेत. उद्या व परवा तापमानामध्ये वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान वाढते तापमान लक्षात घेता उष्माघाताचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे व खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन करतानाच जिल्हा आरोग्य विभागाने उष्माघातावर तातडीने उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असून आगामी काही दिवसात (Heat wave warning) उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्शियमने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान ४५ अंश सेल्शियस पेक्षा जास्त असेल तर त्याभागात उष्णतेची लाट आली, असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे सन बर्न, हिट कॅम्प्स (उष्णतेमुळे स्रायुंना गोळे येणे), हिट एग्जोर्शन (उष्णतेमुळे प्रचंड थकवा), हिट स्ट्रोक (उष्माघात) यांसारखे प्रामुख्याने उष्णताविकार असून साधारण एप्रिल, मे या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो.

लातूरमध्ये 40 अंशावर पारा गेल्याने (Heat wave warning) उष्माघाताचे आजार होण्याचा धोका आहे. बुधवारी दिवसभर तापमान 39 अंशावर होते. मात्र सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास पारा 40 अंशावर गेला. या तापमानाला शरीर झटपट 'डीहायड्रेट' होते, त्यामुळे नागरिकांनी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या दरम्यान उन्हात जाणे टाळावे. उष्माघातापासून बचाव करण्याचे उपाय करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 महत्वाच्या गोष्टी : 
1. बाहेर जाणे पूर्ण टाळा
- सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरातच रहा
- अत्यंत गरज असेल तरच सकाळी लवकर किंवा सूर्यास्तानंतर जा.
2. पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स
- दर 20-30 मिनिटांनी पाणी प्या, तहान लागली नाही तरी
- दिवसाला 4-5 लिटर पाणी + 2-3 ग्लास ताक/नारळपाणी/ORS
- कांदा सोबत ठेवा - उष्माघातावर पारंपरिक उपाय आहे
3. घर थंड ठेवा
- खिडक्या, पडदे बंद ठेवा, दुपारी काळोख करा
- जमिनीवर पाणी शिंपडा, ओले कपडे वाळत ठेवा
- कुलर/AC नसेल तर पंख्यासमोर पाण्याने भरलेली बादली ठेवा
4. काय टाळायचं
- चहा, कॉफी, दारू, थंड पेये - याने पाणी कमी होतं
- तेलकट, मसालेदार, बाहेरचे जेवण
- रिकाम्या पोटी उन्हात जाणे
- गडद, घट्ट कपडे
5. रेड अलर्ट लक्षणे - 108 ला कॉल करा
- ताप येऊन घाम पूर्ण बंद होणे
- चक्कर, उलटी, खूप डोकेदुखी 
- बोलणं अडखळणे, गोंधळणे
- बेशुद्ध पडणे
लहान मुलं, वृद्ध, गरोदर महिला आणि बीपी/डायबिटीसच्या पेशंट्सना जास्त धोका असतो. त्यांना वेगळ्या खोलीत थंड ठेवा.

उष्माघात कक्षांची स्थापना...
हवामान खात्याने दिलेल्या या इशाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व इतर शासकीय दवाखान्यात उन्हाळाच्या पूर्वतयारी अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत १ मार्चपासूनचं उष्माघात कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर कक्षात उष्णताविकार संबधी रुग्णांसाठी २ खाटा राखीव, मुबलक औषधी साठा, पंखा/कुलरची सोय, पिण्याचे थंड पाणी उपलब्ध ठेवण्यात आलेले आहे. तसेच, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व आरोग्य संस्था स्तरावर प्रसिद्धी साहित्याद्वारे जनजागृती करण्यात येत असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृह भेटी दरम्यान आरोग्य शिक्षण दिले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी एका पत्रकात दिली आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
ताकतोड्यात आरोग्य विभागाचे पथक दाखल; डेंग्यूसदृश आजाराच्या पार्श्वभूमीवर घराघरांत सर्वेक्षण

ताकतोड्यात आरोग्य विभागाचे पथक दाखल; डेंग्यूसदृश आजाराच्या पार्श्वभूमीवर घराघरांत सर्वेक्षण

Taktoda Health Department: तालुक्यातील ताकतोडा येथे डेंग्यूसदृश आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी ता. २ रोजी भेट देत कीटकशास्त्रीय व जलद ताप सर्वेक्षण केले.

Oct 02, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026