रिसोड ग्रामीण रुग्णालय

रिसोड ग्रामीण रुग्णालयात दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवा: आ. अमित झनक

Risod Rural Hospital:

रिसोड ग्रामीण रुग्णालयात दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवा: आ. अमित झनक

Risod Rural Hospital

 

रुग्ण कल्याण समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

रिसोड (Risod Rural Hospital) : तालुक्यातील सर्वसामान्य, शेतकरी आणि गोरगरीब रुग्णांना शासकीय पातळीवर वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या एकाही रुग्णाची गैरसोय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांनी दिल्या. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 'रुग्ण कल्याण समिती'च्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते.

​या बैठकीत आमदार झनक यांनी ग्रामीण रुग्णालयातील (Risod Rural Hospital) आरोग्य सेवांच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेतली. रुग्णांना मिळणाऱ्या दैनंदिन तपासण्या, गंभीर रुग्णांवरील तातडीचे उपचार, आवश्यक औषधांचा मुबलक साठा आणि वॉर्डांमधील नियमित स्वच्छता या सर्व बाबींचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना औषधांसाठी बाहेर जावे लागू नये, तसेच २४ तास वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सेवेत हजर राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

​याशिवाय  (Risod Rural Hospital) रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांची कार्यक्षमता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका सेवा आणि रुग्णालयाच्या इमारतीशी संबंधित आवश्यक पायाभूत सोयी-सुविधांबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली. शासन स्तरावरून ज्या काही अतिरिक्त निधी किंवा साधनसामग्रीची गरज असेल, ती तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही आमदार झनक यांनी यावेळी दिले. ​सदर आढावा बैठकीस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, स्थानिक नगरसेवक, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टैग्स: Risod Rural Hospital