परभणी किडनी दान

परभणीत पत्नीने पतीला किडनी दान करून दिले नवआयुष्य; समाजासमोर ठेवला आदर्श 

Parbhani Kidney Donation: पतीच्या गंभीर किडनी विकारावर मात करण्यासाठी पत्नीने स्वतःची किडनी दान करत समर्पणाचा अनोखा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. येथील ‘शिवनेरी सुपरस्पेशालिटी, सूर्या आयसीयू हॉस्पिटल

परभणीत पत्नीने पतीला किडनी दान करून दिले नवआयुष्य; समाजासमोर ठेवला आदर्श 

Parbhani Kidney Donation

 

परभणीच्या वैद्यकीय इतिहासातील दुसरी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

परभणी (Parbhani Kidney Donation) : पतीच्या गंभीर किडनी विकारावर मात करण्यासाठी पत्नीने स्वतःची किडनी दान करत समर्पणाचा अनोखा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. येथील ‘शिवनेरी सुपरस्पेशालिटी आणि सूर्या आयसीयू हॉस्पिटल’मध्ये शनिवार २६ सप्टेंबर रोजी पार पडलेली ही पहिली यशस्वी (Parbhani Kidney Donation) किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया परभणी जिल्ह्यातील दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे. 

जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथील भारत गणेश घाडगे (वय ४८) हे  किडनीविकारग्रस्त होते. त्यांच्या पत्नी सीमा भारत घाडगे (वय ४५) यांनी आपल्या पतीची चिंताजनक परिस्थिती पाहून क्षणाचाही विलंब न लावता स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या या धाडसी निर्णयामुळे तीव्र किडनीविकारग्रस्त रुग्ण पतीवर परभणीतील तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून (Parbhani Kidney Donation) किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पत्नीच्या या दातृत्वामुळे पतीला नवीन जीवन मिळाले असून, या घटनेने नात्यातील अतूट विश्वास आणि समर्पणाचे एक अनोखे उदाहरण जगासमोर ठेवले आहे.

या क्लिष्ट आणि ऐतिहासिक शस्त्रक्रियेचे यश हॉस्पिटलच्या अनुभवी व तज्ज्ञ वैद्यकीय टीमच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. डॉ. राहुल टेंगसे, डॉ. राजीव राठोड डॉ. संतोष समींद्रे, डॉ. ज्योती समींद्रे, डॉ. अशोक बन,  भूलतज्ज्ञ, डॉ. श्रुती शहारे, डॉ. सतीश राठोड तर वैद्यकीय टीम मध्ये डॉ. संजय खिल्लारे, डॉ.संज्योत गिरी, डॉ. गोविंद पावडे, डॉ. इम्रान हाश्मी, डॉ. पूजा टेंगसे, अवयवदान समन्वयक विनोद डावरे आणि   डॉक्टरांच्या या टीमने कौशल्याने ही शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आणि अवयवदाता पत्नी दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

परभणीकरांसाठी अभिमानास्पद बाब 

एका काळात अशा गंभीर आजारांवर आणि (Parbhani Kidney Donation) किडनी ट्रान्सप्लांटसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे उपचार घेण्यासाठी मुंबई, पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असे. मात्र, आता शिवनेरी सुपरस्पेशालिटी व सूर्या आयसीयु हॉस्पिटलमुळे ही सुविधा परभणीतच उपलब्ध झाली आहे.