सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणी करण्याच्या निर्णयावर आक्षेप…!
परभणी (Parbhani Doctors strike) : महाराष्ट्र मेडिकल कौन्सील मध्ये सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथीक डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयावर पुनर्रविचार करावा. ५ सप्टेंबर २०२५ चा जीआर मागे घ्यावा या मागणीसाठी गुरुवार १८ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला. आयएमएच्या वतीने परभणी जिल्ह्यातही आरोग्य सेवा बंद ठेवत संपात सहभाग घेण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना जिल्हाधिकार्यां मार्फत निवेदन सादर केले.
शासनाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक असमानता, सुरक्षिततेवर धोका, दुहेरी प्रणाली, कायदेशीर व इतर नैतिक मुद्दे, आंतरराष्ट्रीय दर्जा घसरण्याचा धोका, भविष्यातील दुर्गामी परिणाम या बाबत योग्य विचार झालेला नाही. या (Parbhani Doctors strike) निर्णयामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेत गोंधळ निर्माण होऊन जनतेचा विश्वास कमी होईल, प्रलंबीत उच्च न्यायालय खटल्याचा निकाल येई पर्यंत कोणतीही अंमलबजावणी करु नये, नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ पूर्णपणे प्रशिक्षित व पात्र एमबीबीएस डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय परवाना द्यावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
गुरुवार १८ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यातही आयएमएच्या संप करण्यात आला. २४ तासासाठी सर्व आरोग्य सेवा बंद ठेवण्यात आल्या. (Parbhani Doctors strike) मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. या निवेदनावर अध्यक्ष राजगोपाल कालाणी, सचिव डॉ. विजय बोंडे, डॉ. निहार चांडक यांच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदनावेळी मोठ्या संख्येने डॉक्टरांची उपस्थिती होती.