यावर्षी पाऊस उच्चांक गाठण्याची शक्यता
गडचिरोली (Heavy Rain) : यावर्षीच्या पावसाळयात पाऊस सरासरी गाठणार असे भाकीत हवामान खात्याने केले होते. हवामान खात्याचा हा अंदाज १०० टक्के खरा ठरला असून गडचिरोली जिल्ह्यात धो- धो बरसला असून सप्टेंबर महिण्याच्या दुसर्या आठवड्यातच पावसाने वार्षिक पावसाची सरासरी गाठली आहे.
पावसाचा कालावधी संपण्यास आणखी १७ दिवस शिल्लक आहेत. यामुळे यावर्षी (Heavy Rain) पाऊस सरासरीचा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १२५४.१ मीमी आहे. पावसाळयात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडत असतो.यावर्षी आतापर्यंत १२९०.४ मीमी पाऊस पडला असून ही टक्केवारी ११२.५ टक्के आहे.
तालुका निहाय विचार करता गडचिरोली तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ११९८.० मी.मी. आहे व त्याची टक्केवारी ९०.७ टक्के आहे.धनोरा तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी १४२०.१ मी.मी. आहे व त्याची टक्केवारी १०३.१ इतकी आहे.
देसाईगंज तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत सरासरी १६६०.५ मी.मी. पाऊस कोसळला. त्याची टक्केवारी १४०.७ इतकी आहे.
आरमोरी तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत सरासरी ११०२.० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.त्याची टक्केवारी १०१.६ इतकी आहे.
कुरखेडा तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत सरासरी १४०३.१ मी.मी. पाऊस कोसळला.हीr टक्केवारी १०४.५ इतकी आहे.
कोरची तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत सरासरी १३१७.३ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.त्याची टक्केवारी १०४.७ इतकी आहे.
चामोशीa तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत सरासरी १०२९.४ मी.मी. पाऊस कोसळला. मुलचेरा तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी १३६८.८ मी.मी. आहे व त्याची टक्केवारी १२१.९ इतकी आहे.
अहेरी तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत सरासरी ११५८.४ मी.मी. पावसाची नोंद झाली आपहे. ही टक्केवारी १००.२ इतकी आहे.
सिरोंचा तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत सरासरी ८८०.८ मी.मी. पाऊस कोसळला व त्याची टक्केवारी ८८.५ इतकी आहे.एटापल्ली तालुक्यात आतापर्यंत सरासरी १४०१.० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.त्याची टक्केवारी ११०.० इतकी आहे.भामरागड तालुक्यात जुन महिन्यापासुन ते आजपर्यंत पडलेल्या पाऊसाची सरासरी १५४५.१ मी.मी. आहे व त्याची टक्केवारी ११४.७ इतकी आहे. आता सद्यास्थितीत परतीचा पाऊस सुरू आहे. आणखी काही दिवस पावसाचा ईशारा देण्यात आला आहे.यामुळे यावर्षी पाऊस उच्चांक प्रस्थापित करते की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्यावर्षी १३ सप्टेंबरपर्यंत १३४ टक्के पावसाची झाली होती नोंद
गेल्यावर्षी २०२४ मध्ये १३ सप्टेंंबरपर्यंत १५३७.२ मीमी पावसाची नोंद झाली होती. ही टक्केवारी १३४ टक्के होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिण्याच्या दुसर्या आठवड्यात सर्वच तालुक्यात १०० टक्केपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती.