मे महीण्यातील अवकाळी पावसासह, अतिवृष्टीने संत्रा पिक हिरावले!
रिसोड (Heavy Rain) : ता.13 ऑक्टोबर 2025 तालुका कृषी कार्यालयाच्या अहवालानुसार तालुक्यातील सुमारे 4000/ हेक्टर फळबाग लागवडीचे क्षेत्रफळ आहे,यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड करणारे शेतकरी आसुन मागील मे महिन्यातील अवकाळी पावसासह,नंतर झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) संत्रा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आसुन आलेला बहर पुर्णपणे गळुन गेल्याने प्रत्येक शेतक-याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.नुकसान भरपाई साठी अनेक शेतक-यांनी (Farmers) तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे.
संत्रा पिकाचे झालेल्या नुकसानाचे भरपाई देण्यासाठी मागणी!
कृषी विभागा (Department of Agriculture) अंतर्गत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने संत्रा पिकाची लागवड केलेली आहे.त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांनी “ऑरेंज व्हिलेज” ही ओळख निर्माण झालेली होती.तेव्हा नक्कीच तालुक्यातील अनेक गावामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी आहेत.परंतु यंदाच्या अतिवृष्टीतील नुकसानाचे निकसाच्या यादीने संत्रा उत्पादक शेतकरी वर्गाची मोठी निराशा झाल्याने आज.ता.13 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील सुधाकर आढाव,केशव कावरखे,रामदास आढाव,सुरेश आढाव,शाम आढाव,देवानंद खरात,संजय खरात,राजु आढाव,भारत आढाव,वैभव जाधव,हरिभाऊ आढाव,विठ्ठल कावरखे आशा संत्रा उत्पादक शेतकरी वर्गाने यंदाच्या अतिवृष्टीतील पावसाने संत्रा पिकाचे (Orange Crop) झालेल्या नुकसानाचे भरपाई देण्यासाठी मागणी निवादनातुन (Judgment) केली आहे.
जफ्फर पठाण (संत्रा व्यापारी जिंतुर)
मागील मे महीण्यातील अवकाळी पावसासह,सततच्या पावसाने संत्रा पिकाला येणारा मृगबहर मोठ्या प्रमाणात गळुन पडला आहे.त्यामुळे यंदा डिरी,फुलो-या मध्ये संत्रा बाग घेतल्या नाहीत.