तिच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक!
उदगीर (Heavy Rain) : उदगीर जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून या नुकसानीमूळे शेतकरी कोलमडून पडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना (Farmers) मदत करण्यासाठी हर्षदा नागनाथ गुट्टे या चिमुकल्या मुलीने तिला मिळालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम पुराने उध्दवस्त झालेल्या शेतकर्याला दिली आहे.हर्षदाकडून पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्यामूळे तिचे कौतूक होत आहे.उदगीर तालुक्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पञकारांनी मदत फेरीचे आयोजन दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी केले होते. यावेळी चिमूकल्या हर्षदाने तिला स्वतःला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली आठवी शिष्यवृत्तीची (Scholarship) संपूर्ण रक्कम पुरग्रस्तांना सुपूर्द केली. हर्षदा नागनाथ गुट्टे ही उदगीर येथील विदयावर्धीनी विदयालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. ती आठवी शिष्यवृत्तीधारक आहे.उदगीर जळकोट तालुक्यात पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले होते. या पार्श्वभूमीवर हर्षदाने आपले शैक्षणिक यश समाजोपयोगी कार्यासाठी वापरत मदतीचा हा उपक्रम राबवला. तिच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
हर्षदाची देणगी!
विद्यार्थ्यांसाठी व तरुणाईसाठी प्रेरणा आहे.शिक्षणातून समाजसेवेचा आदर्श हर्षदाने मदतीतून दाखवला आहे.
आभाळा एवढ मन आसणार्या हर्षदाकडून समाजाने बोध घेतला पाहिजे आशी प्रतिक्रीया जेष्ठ पञकार सचीन शिवशेट्टे व बिभिषण मद्देवाड यांनी दिली.
पुरात उध्दवस्त झालेल्या शेतकर्यांना सढळ हाताने मदत करा!
मी माझी शिष्यवृत्तीची शिदोरी अतिवृष्टीने महापूरात नुकसान झालेल्या शेतकर्यांना दिली आहे. उदगीरकरांनी सढळ हातांनी मदत करावी.जगाचा पोशींदा आज संकटात आहे त्यामूळे आपण त्याला मदत करावी. असे आवाहन चिमूकली हर्षदा गुट्टे यांनी केले आहे.