हिंगोली (Hingoli Agricultural) : कृषी उत्पन्न बाजार समितीची (Bazar Samiti) बैठक ७ ऑगस्ट बुधवार रोजी घेण्यात आली. या बैठकीत मोंढ्यात भुईमुगावर ३ किलोची कट्टी घेतली जात असल्याचा मुद्दा उपस्थित होताच सभापतीसह इतर संचालकांनी या बाबीला विरोध दर्शविला.
कृउबासचे सभापती भैय्या पाटील गोरेगावकर, उपसभापती अशोक श्रीरामे यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक घेण्यात आली. (Bazar Samiti) बैठकीत ईतीवृत्तांत वाचन करण्यात आले असता त्यात काही संचालकांनी मागील जानेवारी ते मार्चच्या आर्थिक अनुपालनाला विरोध दर्शवून त्यावर मतदानाची प्रक्रिया घेण्याचा अट्टहास घेतला. त्यात विरोधात ८ तर सहमतीमध्ये ६ जणांनी सहभाग नोंदविला. (Hingoli Agricultural) त्याचप्रमाणे भुईमुगाच्या विक्रीमध्ये ३ किलो कट्टी घेतली जात असल्याची ओरड शेतकर्यांतून होत असल्याने या बैठकीत संचालक माधव कोरडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला असता सभापतीसह इतर संचालकांनी कट्टी घेऊ नये यावर एकमत ठरविले.
तसेच भविष्यात भुईमुगाच्या शेती मालावर कट्टी घेतल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच इतर काही विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत संचालक मनिष आखरे, माधव कोरडे, उत्तमराव वाबळे, शामराव भांडेगावकर जगताप, शंकरराव पाटील, मुटकुळे, देशमुख, अशोक मुंदडा, बुर्हाण पहेलवान, परमेश्वर मांडगे, बबन नेतने, गजानन घ्यार यांच्यासह सचिव नारायण पाटील यांची उपस्थिती होती.