हिंगोली (Hingoli Andolan) : महाराष्ट्र राज्य आशा वर्कर गटप्रवर्तक यांचे पाच ते सहा महिन्याच्या मानधन तात्काळ खात्यात जमा करण्याच्या मागणीसह विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Hingoli Andolan) करुन मागण्याचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा प्रशासनास देण्यात आले.
आरोग्य विभाग, आशावर्कर व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने सोमवार १९ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Hingoli Andolan) करण्यात आले. या निवेदनात आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा देऊन केंद्र सरकार चा जानेवारी २०२५ पासुन थकीत मोबदला आशा, गट प्रवर्तक यांना त्वरित देण्यात यावा. शासकीय दर्जा मिळेपर्यंत गटप्रवर्तकांना त्वरित कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन आरोग्य विभागात समायोजन करावे, अशा कर्मचार्यांना किमान वेतन म्हणुन २४ हजार रुपये मानधन देण्यात यावे, गटप्रवर्तकांना ३४ हजार पुये किमान वेतन देऊन प्रवास भत्ता देण्यात यावा.
आजारपणामध्ये मृत्यु झाल्यास आशा व गटप्रवर्तकांना १० लाख रुपये मदत दयावी, आशा व गटप्रवर्तकांना ड्रेस हा त्यांच्या आवडीनुसार निश्चित करावा, दिवाळीला बोन देण्यात यावे, यशदा मार्फत आशा व गटप्रवर्तकांचे कामाचे मुल्यमापन करुन किमान वेतन देण्यात यावे. (Hingoli Andolan) केंद्र सरकारने कामगार विरोधी श्रमसहिता केलेल्या आहेत ते मागे घ्यावेत यासाठी २० मे रोजी देशव्यापी संप मागे घेऊन कामगार विरोधी शेतकरी विरोधी केंद्र सरकारचे धोरण रद्द करण्यात यावे. आशा वर्कर व इतर योजना कर्मचार्यांप्रमाणे प्रसुती रजा सहा महिन्याची भर पगारी देण्यात यावी यासह मागील पाच ते सहा महिन्याचे थकीत वेतन तात्काळ खात्यात जमा करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष कॉ.मुगाजी बुरुड, कॉ.राजु देशले, राज्य संघटक राधाबाई पांचाळ, शिवम पांचाळ, शुभम सपकाळ, अर्चना घुगे, सरस्वती दराडे, रिना मानमोठे, प्रज्ञा इंगोले, आशा शिखरे, सिमा सरकटे, अनिता खंदारे, कविता खंदारे, आस्मिता सिरसाट, मनिषा साळवे, जनाबाई गायकवाड, सुजाता वाढवे, अनुष्का भिसे, अरुणा दिपके, सुवर्णा डोंगरे, सुचिता पांडे, सिमा पांडे, रुख्मिणी नरवाडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.




