म.रा. अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघ
हिंगोली (Hingoli Anganwadi Sevika) : अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधन वाढीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका, मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलन झाले. तसेच शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने (Hingoli Anganwadi Sevika) अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ केल्याने हिंगोलीत २ डिसेंबरला आनंदी मेळावा घेण्यात आला.
हिंगोली शहरामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका, मदतनीस महासंघाच्या वतीने २ डिसेंबरला आनंदी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, राज्य संघटक दत्ता देशमुख, हिंगोली जिल्हाध्यक्षा सिंधूताई ठाकुर, नेताजी धुमाळ आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले की, १ ऑक्टोंबर २०२४ पासून राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या प्रतिमहा मानधनात वाढ करण्याचा तसेच त्यांना प्रतिमहा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता दिली होती.
ज्यामध्ये अंगणवाडी सेविकेला (Hingoli Anganwadi Sevika) केंद्राचा सात टक्के हिस्सा २७०० रूपये, राज्य हिस्सा ४० टक्के १८०० रूपये, अतिरीक्त राज्य हिस्सा शंभर टक्के ५५०० रूपये असे सुधारीत प्रतिमहा मानधन १३ हजार रूपये, अंगणवाडी मदतनिसांना केंद्र हिस्सा ७ टक्के प्रमाणे १३०० रूपये, राज्य हिस्सा ४० टक्के प्रमाणे ९०० रूपये, अतिरीक्त राज्यहिस्सा शंभर टक्के प्रमाणे ३२५० रूपये एकूण ५५०० तर आता सुधारी प्रतिमहा मानधन ७ हजार ५०० रूपये व ५ टक्के वाढ दिली जात आहे. शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या संदर्भात आंदोलन केल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनवाढीचा विचार शासनाला करावा लागला. त्यामुळेच ही मानधन वाढ मान्य करण्यात आली.
सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात आली आहे. ही मानधन वाढ करीत असताना शासनाने (Hingoli Anganwadi Sevika) अंगणवाडी कर्मचार्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ केली आहे. त्यामुळे सर्वांनी आपले कर्तव्य समजून काम करावे, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी गरोदर महिला, स्नतदा माता तसे कमी वजनाच्या कुपोषित बालकांना नित्यनेमाने सेवा द्यावी असेही आवाहन भगवानराव देशमुख यांनी केले. या आंनदी मेळाव्याला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका वमदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांचे मार्गदर्शन
अंगणवाडी सेविका, (Hingoli Anganwadi Sevika) मदतनिसांच्या अडचणी सोडविल्या जाणार हिंगोली जिल्ह्यात अनेक अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रश्नाकरीता महासंघाच्या माध्यमातून शासन दरबारी वेळोवेळी प्रश्न मांडले जातात. कुठेही कोणत्याही समस्या असल्यास अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी याबाबतची माहिती दिल्यास सदर अडचणी तात्काळ सोडविल्या जातील अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी आनंदी मेळाव्यात बोलताना दिली.