मतदान प्रक्रियेसाठी हिंगोली आगारातून दिल्या २५ बसेस
खासगी वाहन चालकांची दोन दिवस होणार चांदी
हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी आजपासून दोन दिवस हिंगोली आगारातील २५ बसेस देण्यात आल्याने मंगळवार व बुधवार या दोन दिवशी ग्रामीण भागातील बसफेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Hingoli Assembly Elections) विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे १९ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचार्यांना रवाना केले जाणार आहे.
जिल्ह्यात तिन्ही आगारातून ६२ बसेस या (Hingoli Assembly Elections) निवडणूक प्रक्रियेसाठी देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये हिंगोली आगारातून २५ बसेस दिल्या आहेत. १९ नोव्हेंबरला या बसेस रवाना होणार असल्याने १९ व २० नोव्हेंबर रोजी या दोन दिवशी ग्रामीण भागातील १३ बसेस रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती हिंगोली आगाराच्यावतीने दिली आहे. दोन दिवस ग्रामीण भागामध्ये बसेस जाणार नसल्याने खासगी वाहन चालकांची चांगलीच चांदी होणार आहे.