हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला त्यानिमित्ताने निवडणूक (Hingoli Assembly Elections) आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली. इच्छुकांनी मागील काही महिन्यापासून प्रचारानिमित्त लावलेले फलक व रंगविलेल्या भिंतीवरील नावे मिटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी (Hingoli Assembly Elections) अनेक प्रमुख पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू होती त्या निमित्ताने नेत्यांच्या सभा बैठका व इच्छुक उमेदवारांचे शक्ती प्रदर्शनही करण्यात आले होते. त्या निमित्ताने काँग्रेस, भाजपा, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट, वंचित बहुजन आघाडी यासह विविध पक्षातील इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांच्या नावाने शहरी व गावातील भिंती रंगविण्यात आला होता. एकूणच परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानिमित्त आदर्श आचारसहिता ही लागू करण्यात आली. या (Hingoli Assembly Elections) आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व विभागाच्या यंत्रणेला दिल्या. यानिमित्त हिंगोली शहरात ठिकठिकाणी इच्छुकांचे लावलेले बॅनर पोस्टर तसेच रंगविलेल्या भिंतीवरील नावे मिटविण्याच्या सूचना नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिल्याने मंगळवारीच शहरातील प्रमुख रस्त्यासह इतर ठिकाणचे पोस्टर बॅनर काढून टाकण्यात आले आणि उमेदवारांच्या नावाने रंगविलेल्या भिंतीवर पांढरा चुना मारण्यात आला. त्यामुळे बॅनर पोस्टर काढण्याचे आणि रंगविलेल्या भिंतीवरील नावे मिटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. एकूणच परिस्थिती निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता निमित्ताने प्रशासकीय यंत्रनाही सज्ज झाले आहेत.