हिंगोली (Hingoli Congress) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांचा सभागृहात जातीवाचक वक्तव्याने अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिंगोलीत तीव्र निदर्शने केली. खा. राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याल्यावर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केल्याप्रकरणी हिंगोलीत काँग्रेस कार्यकर्त्यां तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना आ.प्रज्ञा सातव म्हणाल्या की, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. जातनिहाय जनगणनेच्या काँग्रेसच्या मागणीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. यामुळे भाजपचे नेते सैरभैर विधाने करीत सुटले आहेत.
यावेळी काँग्रेस पदधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप खासदार अनुराग ठाकुर यांच्या प्रतिमेला जोडेमारुन आंदोलन केले व भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत चव्हाण, माजी शहराध्यक्ष बापुराव बांगर, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश थोरात, माजी नगरसेवक अनिल नैनवाणी, माबुद बागवान, बासीत मौलाना, एनएसयुआयचे जुबेर मामु, बंटी नागरे, गजानन देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सराफ, माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ, माजी तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख, कृउबा संचालक शामराव जगताप, विलास गोरे, औंढा तालुकाध्यक्ष पंकज जाधव, आदीवासी काँग्रेस सेलचे अध्यक्ष गजानन ढाकरे, पंजाबराव गडदे, सेवादल अध्यक्ष सुदाम खंदारे, वैâलास चव्हाण, संजय राठोड, अतुल घुगे, गुणाजी बोडखे, विलास बेंगाळ, शेख इसराईल, बापुराव मगर, मुजीब कुरेशी, उमाकांत शेवाळकर, आरेफ लाला, अशोक दांडेकर आदी उपस्थित होते.