जिल्हा व सत्र न्यायाधिश टी.एस. अकाली यांनी सुनावला निकाल
हिंगोली तालुक्यातील राहुली खुर्द येथे एकास जिवे मारण्याचा प्रयत्न
हिंगोली (Hingoli Crime) : तालुक्यातील राहोली खुर्द येथे तुमचे कोंबडे आमच्या शेतात का गेले या कारणावरून वयोवृध्दास जीवे मारण्याच्या उद्देशाने कुर्हाडीच्या धारधार पात्याने डोक्यात मारून जीव घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी (Hingoli Crime) गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी अंतिम सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधिश टी.एस. अकाली यांनी गुन्ह्यातील ५ आरोपींना ५ वर्ष कारावास व प्रत्येकी ५५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
राहोली खुर्द येथील किशन रामजी लोणकर हे आखाड्यावर जांभळे जमा करीत असतांना ५ आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा करून त्यांच्या शेतातील आखाड्यावर अनाधिकृतरित्या प्रवेश करून तुमचे कोंबडे आमच्या शेतात का गेली या कारणावरून किशनराव यांना (Hingoli Crime) जीवे मारण्याच्या उद्देशाने कुर्हाडीच्या धारधार पात्याने डोक्यात मारून जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसेच इतरांनी काठीने मारहाण करून जखमी केल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात ९ जुलै २०११ रोजी रंगराव किशन लोणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास अमलदार धोंडीबा कोल्हे, विजय रोडे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधिश टी.एस. अकाली यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. यामध्ये अॅड. एन.एस. मुटकुळे व अॅड. श्रीमती सविता एस. देशमुख यांनी एकुण १३ साक्षिदार तपासले. त्यापैकी वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी, जखमी व इतर साक्षिदारांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश टी.एस. अकाली यांनी ८ ऑगस्ट रोजी या गुन्ह्यातील उत्तम चंद्रभान नरवाडे, चंद्रमुनी उत्तम नरवाडे, हरिभाऊ चंद्रभान नरवाडे, अरविंद उत्तम नरवाडे, आशालता उत्तम नरवाडे सर्व रा. राहोली खुर्द या पाचही आरोपींना ५ वर्ष कारावास आणि प्रत्येकी ५५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रक्कमेपैकी किशन लोणकर यांना १५ हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधिश टी.एस. अकाली यांनी दिले आहेत.
या (Hingoli Crime) प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू अॅड. एन.एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने अॅड. श्रीमती सविता एस. देशमुख यांनी अंतिम युक्तीवाद केला. तर त्यांना सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे आणि कोर्ट पैरवी पी.व्ही. धुर्वे हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे यांनी विशेष सहकार्य केले.
