हिंगोली (Dhangar Samaj Andolan) : संविधानात 36 क्रमांकावर समाविष्ट असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी.) प्रमाणपत्र द्यावे आणि तातडीने एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय ऑफिस समोर सकल धनगर समाजाच्यावतीने (Dhangar Samaj Andolan) धरणे आंदोलन करण्यात आले.
24 सप्टेंबर रोजी जालना येथे मल्हार योद्धा दीपक बोर्हाडे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी समाजातर्फे भव्य इशारा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार 26 सप्टेंबर रोजी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, तर 29 सप्टेंबर रोजी आमदार-खासदारांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे. शासनाने अद्याप मागण्यांची दखल घेतली नाही, तर 1 ऑक्टोबर रोजी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. उपोषणकर्ते दीपक बोर्हाडे यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस असून (Dhangar Samaj Andolan) आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ते बंद होण्याची परिस्थिती उद्भवू शकते, अशी माहिती मल्हार सेना हिंगोली जिल्हाप्रमुख भास्करराव पोले यांनी दिली.
यापूर्वी पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयासमोर धनगर समाजाने उग्र आंदोलने केली. जालन्यातील मोर्चादरम्यान आरक्षणाचा भंडारा आगळावेगळ्या पद्धतीने उधळला गेला आणि तब्बल पाच तास चाललेल्या मोर्चामुळे शासन खडबडून जागे झाले होते. धनगर समाज दर्या-खोर्यात हालाखीचे जीवन जगत आहे. त्यामुळे शासनाने संविधानात नमूद असलेल्या एस.टी. सवलतींची अंमलबजावणी करून समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिस्थिती बदलावी, समाजाला ताठ मानेने जगण्यासाठी नवी दिशा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी (Dhangar Samaj Andolan) मल्हार सेना हिंगोली जिल्हाप्रमुख भास्करराव पोले, अशोकराव दिंडे, पंढरीनाथ ढाले, वामनराव पोले ,वैजनाथ पावडे ,पंजाबराव हराळ, मारोतराव ढाले, शंकरराव ढाले, गजानन हाके, शिवाजी पातळे ,संदीप पोले, आकाश कारगुडे ,दिनकर नाईक, अवधूत मस्के ,शिवाजीराव ढाले, यशवंतराव पाबळे, भारत ढाले, राजेंद्र ढाले ,नामदेव कुरवाडे, यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.