जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दाखवली हिरवी झेंडी
हिंगोली (Revenue Sports) : महसूल विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा (Revenue Sports) व सांस्कृतिक स्पर्धा शुक्रवार पासून जालना येथे सुरु होणार आहेत. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी महसूक संघाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या सीईओ नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, राजेश पुंजाळ, मंजुषा मुथा, आदीची उपस्थिती होती.
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर्षभर कामकाज करावे लागते, यातून त्यांना अधिक कामे करताना चेतना, ऊर्जा मिळावी यासाठी विभागीय स्तरावरून सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी 14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत जालना येथे विभागीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचारी सांघिक व वयक्तिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हिरवी झेंडी दाखविताना जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, महसूल क्रीडा (Revenue Sports) व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्याचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले. सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत अधिकाधिक पारितोषिक पटकवून जिल्ह्याचे नाव लोकीक करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या आहेत.
यासाठी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, माने, समाधान घुटूकडे , तहसीलदार श्रीकांत भुजबळ, शारदा दळवी, जीवक कुमार कांबळे, सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार सचिन जोशी, भालेराव आदिनी विभागीय स्पर्धेत (Revenue Sports) उत्कृष्ठ कामगिरी बजावण्यासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, जालना येथे होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत क्रिकेट, महिला टर्फ क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खोखो, पुरुष, महिला, व्होली्बॉल, या सांघिक खेळासह बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, लॉन टेनिस, एकेरी, दुहेरी, 100 मिटर, 200 मिटर, 400 मिटर धावणे, थाळी फेक, भाला फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी आदींचा समावेश आहे.