३० कोटी ७८ लाखाची अफरातफर; ३३ जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Mahila Bank) : शहरातील महिला अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रिडीट सोसायटी मर्यादीत हिंगोली पतसंस्थेत ठेवीधारकांच्या एकुण ३० कोटी ७८ लाख ९६ हजार ६७६ एवढ्या रक्कमेची अफरातफर व ४ कोटी ४३ लाख ९१ हजार ६५७ रुपये रक्कमेचे आर्थिक नुकसान केल्याने हिंगोली शहर पोलिसात पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालक अशा एकुण ३३ जणांवर न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोलीतील महिला अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रिडीट सोसायटी मर्यादीत पतसंस्थेत अनेक ग्राहकांनी मोठी गुंतवणुक केली होती. ज्यामध्ये खातेदारांची रक्कम देण्याकरीता टाळाटाळ होत असल्याने या प्रकरणात अनेक निवेदन देऊन उपोषण करण्यात आले होते.
या प्रकरणात अर्पित कमलकिशोर बगडीया यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ९ जुलै रोजी या प्रकरणात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने १९ ऑगस्टला हिंगोली शहर पोलिसात या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला.
ज्यामध्ये पतसंस्थेत १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीमध्ये संचालक मंडळातील सर्व व्यक्तींनी कट करून अर्पित बगडीया यांच्यासह इतर ठेविदारांची रक्कम परत न करता ३० कोटी ७८ लाख ९६ हजार ६६७ एवढ्या रक्कमेची अफरातफर ४ कोटी ४३ लाख ९१ हजार ६५७ एवढ्या रक्कमेचे आर्थिक नुकसान केल्याने हिंगोली शहर पोलिसात संचालक मंडळातील अध्यक्षा सौ. रोहीनी जयेश खर्जुले, उपाध्यक्ष सौ. सुमित्रा नारायण डिडाळे, सचिव अश्विनी प्रशांत महालनकर, संचालक सौ. भारती रुपेश महालनकर, सौ. विना अजय भट्टी, सौ. रागिनी प्रितीन खर्जुले, सौ. सुनिता विलास गुंडेवार, सौ. अश्विनी राहुल महालनकर, सौ. पलक जयेश खर्जुले, सौ. मनिषा प्रशांत बिनोडकर, सौ. संचित जयवंत मुधोळकर, सौ. प्रिती संजय बुरसे, जयेश खर्जुले, मुख्य शाखेचे पासिंग ऑफीसर दिनेश नारायणराव आनेकर, वरिष्ठ लिपीक श्रीपाद छबुराव आगदिगे, रोखपाल मोनाली बजरंगराव आंबेकर, कनिष्ठ रोखपाल राजेश्री विश्वनाथ पासंगे, मुख्य लिपीक अजिंक्य अंबादास खर्जुले, लिपीक प्रेरणा राजेश उन्हाळे, सेवक गजानन शिवाजी मापारी, स. साजिद स. नुर, रामदास कैलास कुंडकर, मुख्यलिपीक धुडकेकर अनुप्रिया संतोष, रोखपाल प्रितीया प्रमोद परतवार, लिपीक ज्योती योगेश गंगावणे, संजय लक्ष्मीकांत बुरसे, नेहा शंकर गवई, वरिष्ठ लिपीक नारायण यशवंत भुरभुरे, रोखपाल दिव्या दुर्गादास खर्जुले, सेवक निवृत्ती विठ्ठल कुंडकर, दिगंबर बालासाहेब भोयर, प्रमाणित लेखापरीक्षक अशोक वामनराव कांबळे, अनिल पारप्पा बंधू या ३३ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप मोदे हे करीत आहेत.




