देशभक्ती आणि अभिमानाची एक यशस्वी जनभागीदारी!
हिंगोली (Hingoli Municipal Council) : राज्य शासनामार्फत (State Govt) सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025-26, माझी वसुंधरा 6.0 अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण हिंगोली शहरामध्ये चालू आहे. भारत सरकारने 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरु केली. या मोहिमेचा उद्देश नागरिकाना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज (National Flag) फडकविणे आणि तिरांग्याशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. सदर मोहीम राष्ट्रीय ओळख, देशभक्ती आणि अभिमानाची एक यशस्वी जनभागीदारी बनली आहे.
नगरपरिषदचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित!
भारत सरकारने (Government of India) राष्ट्रीय अंमलबजावणी समिती (NIC) ने मंजूर केल्या नुसार दिनांक 02 ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत देशभरात हर घर तिरंगा 2025 हि मोहीम तीन टप्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने हिंगोली नगरपरिषदच्या वतीने मा. प्रभारी मुख्याधिकारी श्री. आशुतोष चिंचाळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला हिरवी झेंडी दाखवून हिंगोली नगरपरिषद प्रशासकीय इमारत येथून तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी नगरपरिषदचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज हा नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे.
मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व नागरिक सहभागी!
त्या अनुषंगाने ही तिरंगा रॅली न. प इमारत मार्गे अग्रसेन चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे न. प. इमारत याठिकाणी तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपमुख्याधिकारी श्री. श्याम माळवटकर, नगर अभियंता श्री. प्रतिक नाईक, नगर रचनाकार श्री. प्रवीण मोहेकर, स्वच्छता निरिक्षक श्री. बाळू भाऊ बांगर, श्री. आकाश देशमुख, श्री. सचिन पवार, श्री. एस. आर. भुरके, श्री. रामेश्वर चाटे, श्री. गोविंद चव्हाण, श्री. संजय दोडल, श्री. देविसिंग ठाकूर, श्री. संदीप घुगे, श्री. शिवाजी घुगे, श्री. प्रवीण चव्हाण, श्री. पंडित मस्के, श्री. गणेश धनगर, श्री. विनय साहू, श्री. अशोक गवळी, श्री. बी. टी. काळे, श्री. एजाज पठाण, श्री. विजय रामेश्वरे, श्री. नितीन पहिनकर, श्री. दिनकर शिंदे, श्री. मनोज बुरसे, श्री. अशोक आठवले, श्री. उमेश वर्मा, शेख साजिद, श्री. अथर्व वर्मा, श्री. वर्धमान सोनटक्के, श्री. रवी गायकवाड, श्री. अजय मंडले, श्री. आकाश गायकवाड, श्री. रवि जोंधळे, श्री. कुणाल कांबळे, श्री. गणेश गायकवाड, श्री. मनीष दराडे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.