हिंगोली (Hingoli Municipality) : नगर परिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगर परिषद कार्यालयात ‘फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.
या (Hingoli Municipality) उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे, तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हा आहे. फटाके फोडल्यामुळे निर्माण होणारा धूर, आवाज आणि प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून फटाके न फोडता, पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या (Hingoli Municipality) वतीने शहरातील नागरिक, शाळा, व्यापारी तसेच स्वयंसेवी संस्था यांना ‘फटाकेमुक्त आणि पर्यावरण पूरक दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच प्लास्टिक विरहित, ऊर्जा- बचतीची आणि स्वच्छतेचा संदेश देणारी दिवाळी साजरी करण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अथर्व वर्मा, कुणाल कांबळे, आकाश गायकवाढ, रवि जोंधळे, घंटागाडी वाहन चालक आणि सहायक कर्मचारी आदि उपस्थित होते.




