हिंगोली (Hingoli Pickup vehicle) : शहरातील ओमप्रकाश देवडा पिपल्स को ऑपरेटीव्ह बँक लि. शाखेसमोरून (Hingoli Pickup vehicle) पिकअप वाहनातून राशनचे धान्य नेण्यात येत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तांदळासह वाहन गुरूवारी ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राशनचा काळा बाजार करण्याच्या उद्देशाने गोरगरीब लाभार्थ्यांचे धान्य ६ मार्च रोजी (Hingoli Pickup vehicle) पिकअप वाहनातून नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस अधिक्षकांच्या पथकातील पोउपनि रहीम चौधरी, संग्राम बहिरवाल, धनंजय इंगळे, महादू गव्हाणे, पोलिस उपाधिक्षक कार्यालयाच्या पथकातील गजानन सांगळे, विलास सोनवणे आणि हिंगोली शहर ठाण्याचे सपोनि परगेवार, अशोक धामणे, जी.डी वाबळे, धनंजय क्षिरसागर, संतोष करे यांनी ओमप्रकाश देवडा पिपल्स को ऑप बँकेजवळ पिकअप वाहन क्रमांक एमएच ३८ ए २८२३ या वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात ३६ क्विंटल तांदळाचे कट्टे मिळून आले.
चालकाकडे कोणतेही कागदपत्र नसल्याने हा तांदूळ राशनचा असल्याच्या संशयावरून (Hingoli Pickup vehicle) पोलिसांनी वाहन शहर ठाण्याला लावुन या संदर्भात हिंगोली तहसील कार्यालयाला पत्र दिले. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली.