हिंगोली (Dr. Ramesh Shinde) : जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेती खरडून जात वाहून गेली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना झाला असून राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, कयाधू नदीवरील खरबी येथील बंधारा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांनी केसापूर येथे सरनावर झोपून आमरण उपोषण सुरू केले होते.
याची दखल हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी घेऊन अतिवृष्टीचे नुकसान भरपाई जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यापर्यंत अजून त्यांना फायदा होणार आहे. व वरिष्ठ स्तरावर याची कारवाई सुरू असल्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या प्रतिनिधीने डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांची भेट घेत लेखी स्वरुपात पत्र दिल्याने त्यांनी सरनावरील आमरण उपोषण आंदोलन मागे मागे घेण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कळमनुरी वसमत औंढा नागनाथ व हिंगोली या पाच तालुक्यात मागील अतिवृष्टीत शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेती व सिंचन विहिरी तसेच शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांनी अगोदर मोर्चा व इतर आंदोलने केली होती.
त्यानंतर हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे सरणावर बसून आमरण उपोषणाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात केली होती. या संदर्भात हिंगोली चे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी लेखी स्वरूपात पत्र व्यवहार करत हिंगोली व सेनगाव तालुका घेण्यात आलेला असून 10. ऑक्टोंबर 2025 शासन निर्णयानुसार हिंगोली व सेनगाव तालुक्याला हिंगोली जिल्हयातील पुर्ण तालुक्याला सारखाच फायदा होणार आहे.
हिंगोली व सेनगाव तालुका पुन्हा 10 ऑक्टोंबर 2025 शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. या कारणाने आपण आमरण उपोषणाचा जो पवित्रा, स्मशानभूमीत केसापूर या ठिकाणी आंदोलनाचा घेतला आहे.ते आमरण उपोषण मागे घेण्यात यावे. तसेच सोबत शासन निर्णय मंजूर झालेला देत आहोत आपण या उपोषणापासून परावृत्त व्हावे. काही दिवसातच वसमत, कळमनुरी, औंढा, हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतक-यांना सुध्दा शासन मदत पूर्णतः त्या तालुक्याप्रमाणे मिळणार आहे. करीता आपण या आंदोलनापासून परावृत्त व्हावे.
शासन निर्णय क्र. सीएलएस-2025प्र.क्र.365/म-365/म-3 (मदत-1) दिनांक 10 ऑक्टोबर 2025 नुसार कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.सदर शासन निर्णयानुसार हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्याचा एकत्रित अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस पुरक म्हणुन नोंदविण्यात आले असून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार करण्यात येत आहे. असे आश्वासन लेखी स्वरुपात 15 ऑक्टोंबर रोजी उपोषणार्थी डॉ. रमेश शिंदे यांना दिल्याने केसापूर येथील आयोजित केलेले सरणावरील आंदोलन मागे घेतले आहे.