नळाला आले घाण व गढुळ पाणी
हिंगोली (Hingoli Water supply) : शहरातील गणेशवाडी भागात तब्बल १२ दिवसानंतर पाणी पुरवठा सोडण्यात आला. आलेल्या पाण्याला घाण वास व गढुळ पाणी आल्याने नगर पालिकेने स्वच्छ पाणी पुरवठा (Hingoli Water supply) सोडावा अशी मागणी होत आहे.
महावितरणच्या विज दुरूस्तीनंतर गणेशवाडी भागामध्ये तब्बल १२ दिवसानंतर नळाला पाणी पुरवठा (Hingoli Water supply) करण्यात आला. परंतु आलेले पाणी हे घाण व गढुळ आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.हिंगोलीत सध्या पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. येणार्या पाण्याला घाण वास येत असून उलटी व गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने हिंगोली शहरात स्वच्छ (Hingoli Water supply) पाणी पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतुन केली जात आहे.
