मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र) पक्षाची मागणी
हिंगोली (Hingoli Wet drought) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आज २४ सप्टेंबर बुधवार रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्फत निवेदन देऊन हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
तसेच हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान (Hingoli Wet drought) झालेल्या पिकांची घरांची आणि पशुधनाचे प्रशासनामार्फत पंचनामे करा, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज माफ करा, सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्वरित शिष्यवृत्ती द्या, सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा, सुशिक्षित बेरोजगारांना युवकांना वीस हजार रुपये बेरोजगार भत्ता द्या.
जिल्ह्यातील सर्व भूमीहीन शेतमजूर कामगार यांना पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या, श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरित आर्थिक अनुदान वाटप करा, लाडक्या बहिणी योजनेचे पुढील सहा महिन्याचे अनुदान महिलांच्या खात्यावर जमा करा, हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर भूमीहीन कामगार मजूर गरीब दारिद्र्यरेषेखाली लाभार्थ्यांना सहा महिन्याचे एकत्रित स्वस्त धान्य त्वरित वाटप करा या मागण्या करण्यात आल्या.
अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, मनिष आखरे,जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रवि शिंदे, माधव कोरडे विधानसभा अध्यक्ष गणेशराव गडदे, अवधूत निळकंठे , बंडू मुटकुळे, रमेश सानप,शेख बाबा, अभिजीत देशमुख, सोनु चव्हाण,धीरज काकडे,खाजा अमित कळासरे बागवान इरू पठान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याव कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.